Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

ड्युटीवर गेलेल्या निर्माणी कर्मचाऱ्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      सकाळी आपल्या ड्युटीवर गेलेल्या एका निर्माणी कर्मचाऱ्यांचा मृतदेह आयुध निर्माणी येथील एका पाण्याच्या टाकीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

सदर घटना दिनांक 19 रोज शनिवारला सायंकाळी सहा वाजता आयुध निर्माणी येथील भवन क्रमांक 713 जवळील एका पाण्याच्या टाकीजवळ उघडकीस आली. शेखर शालिकराम रामटेके, वय 52 वर्ष ,राहणार आयुध निर्माणी वसाहत असे मृतक कर्मचाऱ्याचे नाव आहे.

घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मर्ग दाखल केला. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये