ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वनजमिनीत रखडलेल्या सिंचन तलावांना “पाझर” कधी फुटणार?

शेतकऱ्यांच्या पदरात सिंचनाची निराशाच  ; ना..शेती...ना...पाणी ना..मोबदला ; वनजमिनीचा प्रश्न मार्गी लागणार काय? शेतकऱ्यांचा सवाल?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- शेतकऱ्यांना शाश्वत करण्यासाठी व शेती सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे तर दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.या जिल्ह्याचे सुपुत्र असलेले वनमंत्री व पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार कडून याच जिल्ह्यातील मुल,पोभुर्णा, बल्लारपूर, चंद्रपूर शहरात विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीचा वर्षाव होत असताना जिवती तालुक्यात मात्र निधीअभावी विकास कामाला खीळ बसली आहे.वनविभागाच्या कचाट्यात

अडकलेल्या सिंचन तलावाची कामे ९ वर्षांपासून रखडली गेली आहे.सातत्याने नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या जिवती तालुक्यातील शेतकरी डोंगर पठारावरील दगडात मशागत करून कोरडवाहू शेती केल्याशिवाय पर्याय नाही.वनविभागाच्या कचाट्यात अडकलेली सिंचन तलावाचे कामे पुर्वरत चालू केल्यास नक्कीच पहाडावरील शेतकरी सुजलाम सुफलाम बनेल, हरित क्रांती होईल.अनेकांना शेतीचा रोजगार मिळेल यासाठी शासन प्रशासनाने सकारात्मक लक्ष देत वनजमिनींचा प्रश्न मार्गी लावत रखडलेल्या सिंचन तलावांच्या कामांसाठी’पाझर’ फोडण्यासाठी कोण पुढाकार घेईल आणि कधी घेईल हा प्रश्न आहे.

 जिवती तालुक्यातील गुडशेला,कोदेपुर,जिवती,धोंडामांडवा गावात लघुसिंचाई विभागाच्या वतीने २०१३ मध्ये सिंचन तलावाचे काम सुरू करण्यात आले होते. त्यासाठी आवश्यक असलेल्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनीला मोबदला देऊ असा करारनामा करून त्या शेतकऱ्यांची जमिन अधिग्रहण केली होती. माञ त्या शेतकऱ्यांना त्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही. अन् पाणीही मिळाले नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश सुरूच आहे. उर्वरीत शेतीला तरी तलावाच्या पाण्याचा फायदा होईल आणि मोबदलाही मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या होत्या कामही युध्दपातळीवर सुरू झाले होते. २०१५ मध्ये महसुल विभागाने विनापरवाना शेत जमिनीचे खोदकाम केल्याचा ठपका ठेवत कंञाटदावर २ कोटी १३ लाख रूपयाचा दंड ठोठावले होते. असे असतानाच जिवती तालुक्यातील संपूर्ण जमिनच वनविभागाची असल्याचा निर्णय नागपूर खंडपिठाने दिल्याने सदर परिसरातील जमिनीवर सुरू असलेले विकासकामे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट व नोटीस देऊन सदर तलावाचे खोदकाम वनविभागाच्या हद्दीत झाल्याचे सांगत कोदेपुर, गुडसेला व जिवती येथे सुरू असलेले सिंचन तलावाचे काम बंद पाडले आहे.याला तब्बल नऊ वर्षाचा कालावधी पुर्ण होत आला.जमिनि अधिग्रहण केलेल्या शेतकऱ्यांचे मात्र वांद्ये आले आहे.शेतीही गेली अन् मोबदलाही मिळाले नाही. अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी लेखी व तोंडी सुचना दिल्या परंतु आश्वासना शिवाय काहिच पदरी पडले नाही.

वर्षानुवर्षे निसर्गाच्या पावसाच्या अनियमित पणामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जात आहे आणि वनविभागाने आडकाठी टाकल्याने पहाडावरिल शेतकऱ्यांवर संकटच कोसळले आहे.

◆ शेतकऱ्यांच्या नशीबी सिंचनाची निराशाच!

कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ यामुळे पहाडावरील शेतकरी पुर्णता खचला आहे.निसर्गाच्या भरोश्यावर कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना निसर्गाची साथ मिळत नाही.यंदाही निसर्गाने साथ दिली नाही. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला योग्य भाव मिळाला नाही.त्यामुळे हतबल झालेल्या शेकडो शेतकरी रब्बी हंगामाकडे वळले मात्र तिथेही तलावाच्या पाण्याची साथ मिळाली नाही.पिक हातात येण्याआधीच करपली गेली अशा विविध कारणांनी पहाडावरील शेतकरी खचला जातो.त्यांना सावरण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन प्रशासनाने या क्षेञात सर्वेक्षण करून आवश्यक त्या ठिकाणी बंधारे,तलाव,व छोठे मोठे बांध तयार करून जमिनीत पाण्याची पातळी वाढविल्यास नक्कीच पहाडावरील शेती सुजलाम सुफलाम होईल.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये