आमदार मनोज कायंदे यांच्या प्रयत्नातून देऊळगाव राजा व सिंदखेड राजा येथे होणार 12 मंडळ अधिकारी व 18 तलाठी कार्यालय बांधकाम
4.95 कोटी रुपयांची मंजुरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सिंदखेड राजा विधानसभा क्षेत्राचे युवा तडफदार आमदार मनोज कायंदे यांनी विकास कामाचा झंझावात सुरू केला आहे. देऊळगाव राजा येथे 5 मंडळ अधिकारी कार्यालय व सिंदखेड राजा येथे 5 मंडळ अधिकारी कार्यालय व 18 तलाठी कार्यालय बांधकाम करण्यासाठीं 4.95 कोटी रुपयांची मंजुरी द्यावी अशी मागणी आमदार मनोज कायंदे यांनी उप मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या कडे 4 फेब्रुवारीला केली होती.
अजितदादा पवार यांनी या मागणीची तात्काळ दखल घेत मंडळ अधिकारी कार्यालय व तलाठी कार्यालय बांधकाम करण्यासाठीं 4,95 कोटी रुपयांची मंजुरी 25 फेब्रुवारी रोजी देण्यात आली आहे. त्यानुसार देऊळगाव राजा येथे 5 मंडळ अधिकारी कार्यालय बांधकाम साठी 1कोटी 5लाख 14 हजार रुपये
सिंदखेड राजा येथे 18 तलाठी कार्यालय बांधकाम करण्यासाठीं 2 कोटी 43 लाख 97 हजार रुपये, तसेच 7 मंडळ अधिकारी कार्यालय बांधकाम करण्यासाठीं 1 कोटी 45 लाख 84 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
अशा प्रकारे एकूण 4 कोटी 95 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, देऊळगाव राजा व सिंदखेड राजा येथे नवीन प्रशस्त मंडळ अधिकारी कार्यालय व तलाठी कार्यालय बांधकाम लवकरच सुरू होणार आहे