ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागलोन येथील तंटामुक्ती अध्यक्ष चेतन ढवस यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात बांधले शिवबंधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

तालुक्यातील नागलोन येथील सामाजिक कार्यकर्ते तथा तंटामुक्ती अध्यक्ष चेतन ढवस यांनी युवासेना विधानसभा समन्वयक निखिल मांडवकर यांच्या सहकार्याने जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात शिवबंधन बांधून कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश घेतला आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या धर्तीवर पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनात अनेक सामाजिक उपक्रम राबविल्या जात आहे. त्यांच्या कार्याला प्रेरित होऊन अनेक नवतरुण पक्षात प्रवेश घेत आहे. यामध्ये तालुक्यातील नागलोन येथील सामाजिक कार्यकर्ते तथा तंटामुक्ती अध्यक्ष चेतन ढवस यांच्यासह कार्यकर्त्यांनी युवासेना विधासभा समन्वयक निखिल मांडवकर यांच्या सहकार्याने जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश घेतला.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मनीष जेठाणी, युवासेना जिल्हा समन्वयक तथा माजी नगरसेवक दिनेश यादव, जेष्ठ शिवसैनिक चिंतामणी मांडवकर व आदी शिवसैनिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये