ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमदार सुभाष धोटेंनी घेतला जिवती तालुक्याचा आढावा

जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :– पंचायत समिती जिवती येथे आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली जिवती तालुक्यातील विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तालुक्यातील विविध समस्या, नागरिकांच्या तक्रारी, विकास कामांचा आढावा घेतला. जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्याच्या सुचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. शालेय सत्राला सुरूवात झाली असून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन मानवविकास कार्यक्रमांतर्गत आवश्यक बसांचे व वेळापत्रकांचे योग्य नियोजन करणे, शिक्षण, आरोग्य, कृषी, विज वितरण, महसूल, वनविभागासह विविध विभागांचा आढावा घेऊन नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याच्या सुचना केल्या. आढावा सभेपूर्वी आ. धोटे यांनी जिवती तालुक्यातील नारायणगुडा, भोलापठार, लेंडीगुडा यासह अनेक गावांना भेटी देऊन स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणुन घेतल्या.
या प्रसंगी संवर्ग विकास अधिकारी भागवत रेजीवाड, नायब तहसिलदार शिल, विविध विभागांचे अधिकारी, जिवती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, महिला अध्यक्ष नंदाताई मुसने, माजी सभापती, प्रा. सुग्रीव गोतावडे, माजी उपाध्यक्ष अश्फाक शेख, देविदास काबंडे, सोपान शिकारे, उपसरपंच लहु गोतावडे, सदस्य उत्तम कराडे, अंबादास जाधव, मुद्रिका पोडे, दत्ता शिकारे, दिगांबर केंद्रे, प्रकाश राठोड, रागोबा तोगरे, बालाजी वाघमारे, माधव उड़तेवाड, आनंदराव पाटील, समूदर गुमेवाड, बालाजी गायकवाड, शोधूमल गायकवाड, चंद्रकांत पट्टेवाले, गणेश तोगरे, बालाजी पट्टेवाले, तिरुपती तोगेर, विठ्ठल पट्टेवाले, नागनाथ वाघमारे यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये