ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तलाठी व वनरक्षक पदांच्या  निःशुल्क टेस्ट सिरीजच्या सहा टप्प्यांत हजारो युवक-युवतींचा सहभाग

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) युवा-युवती सेना व चंद्रपूरच्या अस्पायर प्रोफेशनल अकॅडमीचा संयुक्त उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांचे विशेष मार्गदर्शन

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या विशेष मार्गदर्शन दि. ९ जुलै ते २० ऑगस्ट २०२३ या कालावधीत पार पडलेल्या तलाठी व वनरक्षक पदांच्या निःशुल्क टेस्ट सिरीजच्या सहा टप्प्यांत हजारो युवक-युवतींनी सहभाग घेतला. सदर उपक्रम शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) युवा-युवती सेना व  चंद्रपूरच्या अस्पायर प्रोफेशनल अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. आज दि. २० ऑगस्ट रोजी दोन्ही परीक्षा केंद्रावर सहभागी परीक्षार्थींना पुढील मार्गदर्शक सुचनांसह  नास्ता व चहा देवून या उपक्रमाचा समारोप करण्यात आला.
युवासेनाप्रमुख आ. आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेने हा उपक्रम जिल्ह्यातील युवक व युवतींकरीता राबविण्यात आला. वरोरा येथील कर्मवीर विद्यालय आणि भद्रावती येथील डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालयात या टेस्ट सिरीजचे केंद्र ठेवण्यात आले होते. या परीक्षेचा पहिला टप्पा ९ जुलै, दुसरा टप्पा १६ जुलै, तीसरा टप्पा २३ जुलै, चवथा टप्पा ३० जुलै, पाचवा टप्पा १३ ऑगस्ट आणि सहावा टप्पा २० ऑगस्ट या तारखांना राबविण्यात आला. यादरम्यान दि. २ ते ८ ऑगस्ट या कालावधीत भद्रावती येथील प्रा. धनराज आस्वले यांच्या लेऑऊटवरती सैन्य व  पोलीस भर्ती पूर्व मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. दि.६ ऑगस्ट रोजी वरोरा येथील राधा मिलन सभागृहात वर्धा येथील प्रसिध्द वक्ते प्रा. नितेश कराळे यांचा  स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन  कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
युवासेना सचिव वरुण सरदेसाई, युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा मुबंई विद्यापीठाचे सिनेट सदस्य शितल देवरुखकर, युवासेना कार्यकारिणी सदस्य, हर्षल काकडे, युवासेना विभागीय सचिव तथा गोडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखेडे, पूर्व विदर्भ सघंटीका व प्रवक्ता  शिल्पा बोडखे यांच्या नेतृत्वात तसेच माजी संपर्क प्रमुख अजय स्वामी, जिल्हा सघंटीका  नर्मदा बोरेकर, वरोरा-भद्रावती विधानसभाप्रमुख रविंद्र शिंदे व जिल्ह्यातील सर्व जेष्ठ (पुरुष, महीला) युवा-युवती पदाधिकारी यांच्या  मार्गदर्शनात युवा-युवती सेने तर्फे हा उपक्रम पार पडला. उप-जिल्हा प्रमुख भास्कर ताजणे, विधानसभा संघटक मंगेश भोयर, वैभव डहाने, विधानसभा समन्वयक, युवती सेना अधिकारी प्रतिभा मांडवकर यांच्या नेतृत्वात वरोरा व भद्रावती येथे सराव परीक्षेच्या सहाही टप्प्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले .
डॉ. विवेक शिंदे प्रशासकिय महाविद्यालय येथे  या परीक्षा केंद्रावर परीक्षक म्हणून प्रा. अश्लेषा जिवतोडे भोयर, शिव गुडमल, स्नेहा बन्सोड, भावना खोब्रागडे, राहुल मालेकर, गौरव नागपूरे आणि महेश निखाडे यांनी जबाबदारी पार पाडली.  याप्रसंगी भद्रावती तालुकाप्रमुख नंदू पढाल, शहर प्रमुख घनश्याम आस्वले, युवासेना तालुका प्रमुख राहुल मालेकर, युवासेना सरचिटणीस येशु आरगी आणि माजी नगरसेवक प्रशांत कारेकर यांच्यासह शिवसैनिकांनी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी  सहकार्य केले.
तसेच वरोरा येथील कर्मवीर विद्यालयातील परीक्षा  केंद्रावर परीक्षक म्हणून प्रतिभा मांडवकर, प्रा. प्रिती पोहाणे, मंगेश भोयर, प्रुफुल ताजणे, शशिकांत राम, अनिल सिंग, सृजन मांढरे, स्वाती ठेंगणे, तेजस्वीनी चंदनखेडे, कार्तीक कामडे, सोनल चालेकर, निखिल मांडवकर, कार्तिक कामडे यांनी काम बघीतले. वरोरा तालुकाप्रमुख दत्ता बोरेकर, सुधाकर बुरान, देविदास ताजणे, चंद्रकांत जिवतोडे, युवराज इंगळे व शिवसैनिक यांनी परीक्षा सुरळीत पार पाडण्यास सहकार्य केले.

   आय.ए.एस. आणि आय.पी.एस. अधिकारी मंडळींचे मार्गदर्शन प्राप्त करुन देणार : रविंद्र शिंदे

यापुढे ग्रामीण व शहरी युवक -युवतींना  विविध स्पर्धा परीक्षेत हमखास यश संपादित करता यावे , याद्दष्टीने स्पर्धा परीक्षार्थींना मान्यवर  आय.ए.एस. आणि आय.पी.एस. सेवेतील कार्यरत तसेच सेवा निवृत्त  अधिकारी यांचे  मार्गदर्शन  प्राप्त करून देण्यात येणार आहे. संबंधीत मान्यवर मंडळींशी संपर्क सुरु असून सदर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे लवकर आयोजन करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना (उ.बा.ठा.) वरोरा-भद्रावती विधान सभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये