Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

अवैधरित्या उत्खनन करून चोरून वाहतूक

आरोपी अटकेत ; संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

रोजी स्था. गुन्हे शाखा, वर्धा द्वारे पो. स्टे. अल्लीपुर् हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना खाणगाव ते वरूड परिसरातील कापसी गावाचे रेती घाटातील नदीचे पात्रातून सुरू असलेल्या अवैधरित्या रेती चोरी करून वाहतूक करीत असल्याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे खाणगाव ते वरूड मधील रस्त्या दरम्यान परिसरात सापळा रचून रेड घातला असता वर नमूद आरोपी हे संगणमताने कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी न घेता (गौण खनिज) रेती अवैधरित्या उत्खनन करून चोरून वाहतूक करतांना मिळून आले. आरोपी 1) ट्रक्टर चालक – शुभम पोहनकर वय 26 वर्ष, रा. मोझरी (शेकापुर) ता. हिगणघाट जिल्हा वर्धा 2) ट्रक्टर मालक – संदेश उमक रा. मोझरी (शेकापूर) ता. हिगणघाट . जि. वर्धा (पसार) यांच्या ताब्यातून मोक्यावरून एकूण जुमला किंमत 7,0,5000/-रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीतां विरुध्द कलम 303(2), 3(5) भारतीय न्याय संहिता 2023 सहकलम 3(1)181 मो वा का कायद्यान्वये पो.स्टे. अल्लीपूर् येथे गुन्हा नोंद करण्यात आले आहे.

कारवाई पथक मा. पोलिस अधीक्षक, अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.विनोद चौधरी, पो. हवा. नरेंद्र पाराशर, ना.पो.अं. नितीन इटकरे, सागर भोसले, पो. अंम. संघसेन कांबळे, मिथुन जिचकार सर्व स्था.गु.शा. वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये