ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेती घाटाचे लिलाव त्वरित सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावे

सावली तालुका सरपंच संघटनेची मागणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

      सावली तालुक्यातील शासकीय रेती घाट त्वरित सुरू करण्यात यावे यासाठी सावली तालुका सरपंच संघटनेचे निवेदन नुकतेच चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहे.

     चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुका हा संवेदनशील तालुका असे संबोधल्या जाते. सध्या मार्च महिना सुरू झाला आहे झालेला आहे. तालुक्यामध्ये विविध बांधकामे सुरू आहेत. मुख्यत्वे ग्रामपंचायत मार्फतीने तालुक्यामध्ये घरकुले मंजूर असून त्यात प्रधानमंत्री आवास योजना, घरकुल मोदी आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना, यशवंतराव चव्हाण आवास योजना, या गोरगरीब जनतेचे घरकुले शासनाने मंजूर केलेले आहेत आणि त्यांना त्वरित एक ते दोन महिन्यांमध्ये सदर घरकुलाचे बांधकाम सुरू करण्यात यावे. असे आदेश दिलेले आहेत.

मात्र शासकीय रेती घाटाचे लिलाव झालेले असून सुद्धा ती अजूनही सुरू झालेले नाही .यामुळे संबंधित सर्व घरकुलधारकांना तसेच शासकीय बांधकामे असलेले कामे आणि इतर वैयक्तिक कामासाठी तालुक्यात रेती उपलब्ध होऊ शकत नाही आहे.

      ही सर्व विकास कामे रेती अभावी थांबलेली आहेत. ग्रामपंचायत अंतर्गत येणारी विकास कामे रेती अभावी म्हणजेच रेती घाटाचे लिलाव झालेले नसल्यामुळे सर्व बांधकामे ठप्प पडलेले आहेत .याचा ग्रामीण भागातील विकासावर अनिष्ट परिणाम होत आहे . यामुळे सावली तालुक्यातील रेती घाट सुरू करण्यात यावे यासाठी सावली तालुका सरपंच संघटनेने दिनांक ४ मार्च रोजी चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे.

चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना सावली तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष पुुरूषोत्तम चुधरी, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे, पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे सावली तालुका अध्यक्ष अनिल गुरनुले, सावली तालुका युवा काँग्रेस अध्यक्ष किशोर कारडे, सावली तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय मजोके, चिखलीचे सरपंच रेखा बानबले, चारगावच्या सरपंच ज्योती बहिरवार, चकपीरंजी सरपंच उषा गेडाम, गेवरा खुर्द सरपंच उषा आभारे, मोखाळा च्या सरपंच प्रणिता माशाखेत्री, निमगावच्या सरपंच गीता लाकडे, पेंढरी मक्ता सरपंच ठुमदेवी वलादे, व्याहाड खुर्द सरपंच सुनीता उरकुडे, बोरमाळा सरपंच भोजराज धारणे , हिरापूरच्या सरपंच प्रीती गोहणे, अंतरगाव चे सरपंच कवींद्र लाकडे, लोंढोली सरपंच उष्टुजी पेंदोर, विहीरगाव सरपंच हेमंत ढोक, उपरी सरपंच कुमुद सातपुते, कवठी च्या सरपंच कांता बोरकुटे, चांदली च्या सरपंच विठ्ठल येग्गावार, हरंबा येथील उपसरपंच प्रवीण संतोषवार, डोनाळ्याचे उपसरपंच जितेश सोनटक्के,श्रीकांत बहिरवार आदी सावली तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये