संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती, ब्रम्हपूरी द्वारा 379 प्रस्ताव मंजूर
उर्वरित प्राप्त प्रस्ताव मार्च 10 तारखेला मंजूर करण्यात येतील - प्रा.रामलाल महादेव दोनाडकर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार
अध्यक्ष संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती ब्रम्हपूरी
ब्रह्मपुरी तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक नुकतीच दि. 26/ 2/ 2024 रोजी समितीचे अध्यक्ष प्रा.रामलाल महादेव दोनाडकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला समितीचे सदस्य विलास सांगोळकर,सौ. कविता धर्मपाल राहाटे,पवन विजय जयस्वाल, मारोती रामाजी ठेंगरे,स्वप्नील शशिकांत अलगदेवे,राजेश्वर नारायण मगरे इत्यादी समितीचे सदस्य उपस्थित होते.
तर पंचायत समितीचे वतीने शासकीय सदस्य म्हणून आरोग्य विस्तार अधिकारी खोब्रागडे,नगर परिषदेचे शासकीय सदस्य म्हणून मंगेश बोंद्रे सहाय्यक कार्यालय अधीक्षक नगरपरिषद ब्रम्हपूरी. नायब तहसीलदार तथा समितीची सचीव महानंदा मडावी,महसूल सहाय्यक (कनिष्ठ लिपिक)टि.बी. राऊत, सहाय्यक महसूल राकेश नैताम, आपरेटर प्रियंका वालदे इत्यादी उपस्थित होते.
या बैठकीत संजय गांधी निराधार योजनांचे 170 लाभार्थींचे तर श्रावणबाळ योजनेचे 209 लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. उर्वरित प्रस्ताव तसेच प्राप्त प्रस्ताव येत्या मार्च 10 तारखेला समितीची बैठक आयोजित करून प्रस्ताव मंजूर करण्यात येतील. अशी माहिती संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष प्रा. रामलाल महादेव दोनाडकर यांनी दिली असून या योजनेतील लाभार्थ्यांना लाभ घेण्यात काही अडचणी असल्यास माझेशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे..