ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भूमिगत कोळसा खाणीला विसापुरातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

सनफ्लॅग आयर्न अँड स्टील को. लिमि कंपनीचा

चांदा ब्लास्ट /विसापूर/ गणेश टोंगे

विसापूर : 2022 मधे विसापुरात अचानक चर्चेत आलेली भिवकुंड कोल ब्लॉक ही भूमिगत कोळसा खाण सनफ्लॅग आयर्न अँड स्टील को. लिमि. या कंपनीला केंद्र सरकारने आवंटित केल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने शेतकरी व कंपनीची गावात बैठक घेण्यात आली होती. शेतकऱ्यांनी भूमिगत खदानीला विरोध केल्याने चर्चा फिस्कटली. परंतु, आता अचानक विसापूर गावातील दोन तीन शेतकऱ्यानी आपली शेती लाखोच्या भावात  एका दलालाला विकल्याचे लक्षात आल्यावर गावात संशयाचे पेव फुटले आहे.

 

कंपनी गुपचूप दलालामार्फत शेती तर घेत नाही ना, या विवंचनेत परिसरातील शेतकरी पडला आहे. त्यानुषंगाने गावात काही सजग नागरिकांनी शेतकऱ्यांची गावात बैठक घेऊन समिती गठीत केली आहे. आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मोबदला, कंपनीत नोकरी व खुली कोळसा खाण कंपनी करत असतील, तरच जमिनी अधिग्रहीत करू द्यायचे, नाहीतर कंपनीला कुठल्याही प्रकारचे काम न करू द्यायचे ठरवले असून या सभेला उपस्थित शेतकरी वर्गातून समिती तयार करण्यात आलेली आहे.

 

भिवकुंड कोल ब्लॉकमध्ये विसापूर, नांदगाव परिसरातील जवळपास ८०२ हेक्टर क्षेत्रावर हा प्रकल्प भूमिगत

  • करण्याचा सनफ्लॅग आयर्न अँड स्टील को. लिमि कंपनीचा मानस आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना जागरूक करून शेतकऱ्यांचा भूमिगत खाणीला तीव्र विरोध दर्शवला आहे

त्यामुळे कंपनीने काही काळ प्रस्ताव स्थगित ठेवला आणि आता त्यांनी वन विभाग व महसूल विभागाच्या हरकती जाणून घेतल्या आहेत. परंतु, संपूर्ण खाण ही भूमिगत करण्यात येत असल्याने २५ ते ३० हेक्टर जमीनच का घेण्यात येत असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याने व त्याची सुरुवात विसापूर गावातील दोन तीन शेतकऱ्यांची शेती लाखोच्या भावात एका दलालामार्फत अज्ञात व्यक्तिला किंवा कंपनीला विकल्याचे लक्षात आल्यावर गावात संशयाचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी व नागरिकांनी भूमिगत कोळसा खाणीला विरोध करण्यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहे.शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी गठीत केलेल्या समितीमध्ये अध्यक्ष बंडूभाऊ गिरडकर उपाध्यक्ष शशिकांत पावडे सचिव सूरेश पदिलवार कोषाध्यक्ष योगेश्वर जी टोंगे वामन गौरकर.प्रीतम पाटणकर. दिवाकर डाहुले. अंकुश गीरडकर. गोसाई डाहुले. रवी हरणे. चंद्रकांत येवले. भूपेश गिरडकर उपस्थित शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते

 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये