ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शासकीय तंत्रनिकेतन ब्रह्मपुरीचे विद्यार्थी चमकले आयइडीएसएसए नागपूर झोन मध्ये व्हॉलीबॉल स्पर्धेत 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी : आयइडीएसएसए आय झोन नागपूर अंतर्गत व्हॉलीबॉल स्पर्धा एनआयटी कॉलेज नागपूर येथे नुकत्याच आयोजित करण्यात आल्या. यामध्ये शासकीय तंत्रनिकेतन ब्रह्मपुरी संघाने उत्कृष्ठ खेळ करत उपविजेतेपद पटकावले. या संघात सुशांत महादेव मगरे (कर्णधार) यांच्या नेतृत्वात खेळाडू सार्थक अनिल चोपडे, हर्षद सुखदेव वाकडे, यश विनोद भंडारे, प्रशांत चैतन्य रॉय, अनिरुद्ध अरविंद कोल्हे, वेद राजू बडकी, रितिक विलास भोयर, कुणाल कवडू खोकले, प्रतीक उत्तराज निमसरकार यांनी उत्कृष्ठ खेळ दाखवला व उपविजेतेपद पटकावले.

खेळाडूंना राकेश देवघरे यांच्यासह प्रा. धनंजय पारधी, क्रीडा प्रभारी अधिकारी, डॉ. प्रदीप नंदनवार यांचे मार्गदर्शन लाभले. संघाच्या यशाकरिता डॉ. राजन वानखडे, प्र. प्राचार्य, डॉ. आशिष बहेन्डवार, उपप्राचार्य यांच्यासह सर्व विभागप्रमुख प्रा. माधुरी नागदेवे, प्रा. जयंत बोरकर, प्रा. शालिनी खरकाटे, प्रा. मीनाक्षी मानलवार, प्रा. नितीन डोर्लीकर तसेच कर्मशाळा अधीक्षक प्रा. प्रशांत खानोरकर यांनी अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये