ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोकसभा निवडणूकित शेतकरी संघटनेची भूमिका ठरणार निर्णायक

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर -आर्णी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग आता फुंकले जात असुन नुकतेच भाजपातर्फे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नाव जाहीर झाले आहे. दुसरीकडे काँग्रेस तर्फे आमदार प्रतिभा ताई धानोरकर तथा शिवानी वड्डेटीवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

मागील निवडणुकीचा अंदाज लक्षात घेता याही निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात शेतकरी संघटनेच्या मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गेल्या 40 वर्षापासून राजुरा मतदारसंघ शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला मानला जातो. यासोबतच ॲड.वामनराव चटप यांना दोन दा लोकसभेत मिळालेल्या मतांची संख्या बघता इतरही विधानसभा क्षेत्रात शेतकरी संघटनेची मते दिसुन येते.शेतकरी संघटनेचे नेते विदर्भवादी नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांचा जनसंपर्क विविध आंदोलन आणि शेतकरी संघटनेशी एकनिष्ठ नाते व प्रामाणिकता यामुळे मतदारांमध्ये आजही त्यांची पकड आहे.त्यामुळे शेतकरी संघटनेच्या मताचं मूल्य याही निवडणुकीत वाढणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.

यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वेगळ्या विदर्भ राज्य मिळवून देऊ अशी घोषणा केली मात्र यात सत्ता येताच विदर्भप्रेम विसरले. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाकडूनही वेगळ्या विदर्भासाठी पाहिजे त्या प्रमाणात समर्थन मिळालेले नाही.राजुरा मतदारसंघात काँग्रेस शेतकरी संघटना थेट लढत नेहमीच असते.त्यामुळे चटप काय निर्णय घेतात याच्यावरती लोकसभेचे गणित अवलंबून राहणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये