ताज्या घडामोडी

माणिकगड अंतोरा येथील मिक्सर व सिमेंट पोते चोरणाऱ्या अट्टल चोरटे अटकेत

एकूण जु.की. 5,16,000/-रु चा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सविस्तर या प्रमाणे आहे की, यातील फिर्यादी सुरज ढोले वय 31 वर्षे, रा. आयमा आष्टी ता. आष्टी जि. वर्धा यांना मानीकगड अंतोरा येथील विकास कामाचा काँट्रॅक्ट मिळाला असल्याने त्या कामाचे लेबर काँट्रॅक्ट त्यांनी लेबर ठेकेदार अजय लव्हाळे यांना दिला परंतु नमुद घटना ता वेळी व स्थळी कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी )एक जुनी वापरती बांधकाम मटेरियल बनविण्याकरिता वापरात येणारी मिक्सर मशिन कि. 1,00,000/- रू 2)70 पोते चेतक कंम्पनिचे सिमेंट की. 28,000/- रू असा जु. की. 1,28,000/- रू चा माल कामावरून चोरून नेला अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

          सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा उपविभाग आर्वी पथक करीत असतांना खास बातमीदाराकडुन मिळालेल्या खबरेवरून व तांत्रीक तपासा वरून आरोपी 1) अजय राहुलजी लव्हाळे वय 31वर्ष, रा. लाडकी बुजरूक ता. मोर्शी जि. अमरावती यास ताब्यात घेवुन करुन विचारपूस केली असता आरोपी याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यावरून आरोपी1) अजय राहुलजी लव्हाळे वय 31वर्ष, रा. लाडकी बुजरूक ता. मोर्शी जि. अमरावती व 2) नितीन रामरावजी गाडे वय 29 वर्ष रा. लाडकी बुजरूक ता. मोर्शी जि. अमरावती यांचेकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला माल व गुन्ह्यातील चोरी करतेवेळी वापरलेली फोर व्हीलर गाडी असा एकुन जु किं 5,16,000/- रू चा माल जप्त करण्यात आला असुन सदर आरोपी व जप्त माल तपासी अधिकारी यांचे ताब्यात देण्यात आला आहे.

सदर कार्यवाही मा. प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री संजय गायकवाड यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनि. ऊन्दीरवाडे सफ़ौ. संतोष दरगुडे, पोहवा. भूषण निघोंट, नापोशी. विकास अवचट, राकेश आष्टणकर, हर्षल सोनटक्के यांनी केली

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये