ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदकाची मानकरी कु. साची चावरे हिचा अहीर यांच्या हस्ते सन्मान

चांदा ब्लास्ट

मुंबई येथील आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्ण पदकाची मानकरी ठरलेली भद्रावती निवासी कु. साची संदीप चावरे या बालिकेचा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सन्मान करून तिला क्रीडा क्षेत्रात पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

कु. साची या ६ व्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थीनिने  आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत उत्कष्ठ प्रदर्शन करून सुवर्णपदकाला गवसनी घातल्याने चंद्रपूर जिल्हयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेला असल्याची प्रतिक्रीया या प्रसंगी हंसराज अहीर यांनी व्यक्त केली असून तीच्या क्रीडा क्षेत्रातील महत्वपूर्ण कामगीरीचा आढावा असाच वर्षध्दंगत होत राहो अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. कु. साची या विद्यार्थिनीने ज्या आतर्राष्ट्रीय कराटे स्पर्धेत २० ते २५ वजनगटात सहभाग नोंदविला. त्या स्पर्धेत मलेशियाजपानइटलीदक्षिण आफ्रिकाश्रीलंका या बलाढय देशातील महिला स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत साचीच्या अभुतपूर्व यशामुळे महाराष्ट्र राज्याची मान अभिमानाने उंचावली असून तीच्यावर सर्वच क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या सन्मान कार्यक्रमाप्रसंगी भाजप नेते विजय राऊतखुशाल बोंडेमाजी उपमहापौर अनिल फुलझेलेराजु घरोटे यांचेसह अनेकांची उपस्थिती लाभली होती. सर्वांनी या बालिकेच्या यशाबद्दल कौतुक करून तिला क्रीडा क्षेत्रात भावी काळात उज्वल यश लाभो अशा शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये