Sudarshan Nimkar
गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

परवाना (रॉयल्टी) नसताना रेती,गौनखनिजाची चोरी

नाकेबंदी दरम्यान टीप्पर चालक व इतर आरोपी पोलिसांच्या ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 24/02/2024 रोजी पहाटे 03.30 वा. ते 05.45 वा. दरम्यान पोलीस स्टेशन सेवाग्रामचे हद्दीतील करंजी (भोगे) रोड वरील विवेक भोयर यांचे विट्टगट्टी समोरील रोडवर मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल चव्हाण सा. उपविभाग, पुलगाव याच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात गोपणीय माहितीवरून नाकेबंदी करीत असताना, यातील नमुद आरोपी वाहन चालक हे त्यांचे ताब्यातील टिप्पर / ट्रक मध्ये बिनापास परवाना (रॉयल्टी) नसताना रेती गौनखनिज चोरुन त्याची वाहतुक करुन घेवुन जाताना मिळुन आल्याने आरोपी वाहन चालकांच्या ताब्यातुन १) प्रती ट्रक/टिप्परमध्ये अंदाजे 3 ब्रास रेती प्रमाणे एकुण 10 ट्रक/टिप्पर मध्ये 30 ग्रास रेती (गौण खनिज) प्रती ब्रास रु. 4,000/- प्रमाणे रु. 1,20,000/- 2) एकुण 10 ट्रक/टिप्पर क्र. 1) MH 40 N 7711, 2) ΜΗ 40 Y 8374, 3) MH 32 Q 6539, 4) MH 29 T 0893, 5) MH 04 EY 9195, 6) MH 31 CQ 2201, 7) MH 31 CB 8264, 8) MH 40 Y 9695, 9) MH 40 Y 3324, 10) MH 27 BX 3592 प्रती ट्रक / टिप्पर अंदाजे कि. रु. 9,00,000/- प्रमाणे एकुण रु. 90,00,000/- व ३) आरोपीतांच्या अंगझडतीत मिळालेले जुने वापरते 07 अॅन्ड्राईड मोबाईल व चार साधे मोबाईल फोन एकुण रु. 53,000/- असा एकुण जु.कि. रु. 91,73,000/- (एक्यावन्न लाख त्रेहात्तर हजार रुपये) चा मुद्देमाल पचासमक्ष मोक्का जप्ती पंचनामा प्रमाणे जप्त करुन आरोपीतांसह ताब्यात घेतला.

सदर आरोपीतांविरुध्द पो.स्टे. सेवाग्राम येथे अप. क्र. 151/2024 कलम 379, 34 भा. द. वि. सहकलम 130, 177 मो. वा. का. प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.

सदर गुन्हयात आरोपी वाहन चालक व क्लिनर 1) विठ्ठल कुणाजी पिंपळे, वय 54 वर्ष, रा. येळाकेळी ता. जि. वर्धा 2) गौतम महादेव नाईक, वय 42 वर्ष, रा. येळाकेळी ता. जि. वधां ३) आशीष अरुण थुल, वय 28 वर्ष, रा. हनुमानगड पिपरी, ता. जि. वर्धा, 4) योगेश लिलाधर हिवरे, वय 27 वर्ष, रा. वैदय ले आऊट, पिपरी (मेघे), 5) राष्ट्रपाल विरेंद्र इंगळे, वय 35 वर्ष, रा. येळाकेळी ता. जि. वर्धा, 6) घनशाम शेषराव सुरजुसे, वय 35 वर्ष, रा. खैरी कामठी, ता. सेलु जि. वर्धा, 7) महेश प्रताप टेकाम, वय 42 वर्ष, रा. बोरगाव सावली ता.जि. वर्धा, 8) किशोर बापुशहा उईके, वय 42 वर्ष, रा. सावध, ता. आर्वी, जि. वर्धा, 9) रामु शामराव भंडारी, वय 56 वर्ष, रा. येळाकेळी, ता. जि. वर्धा, 10) बंडु सहादेवराव पाटील, वय 42 वर्ष, रा. जुनापाणी पिपरी (मेघे), 11) गजानन पांडुरंग सोमलकर, वय 45 वर्ष, रा. टेलीकॉम नगर, वर्धा व 12) जयहिंद पेंडारु मेश्राम, वय 43 वर्ष, रा. समता नगर, वर्धा यांना अटक करण्यात आलेली असुन सदर गुन्हयाचा तपास सुरु आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक, श्री. नुरुल हसन, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री सागर कवडे, मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग, पुलगाव श्री. राहुल चव्हाण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार विनित घागे यांचेसह पोलीस स्टेशन सेवाग्राम येथील पो.उप.नि. वसंत शुक्ला, शिवराज कदम, स.फौ. दिलीप कडु, पो.हवा. सचिन सोनटक्के, मंगेश झांबरे, चालक पो.हवा. विलास लोहकरे पोहवा हरीदास काकड, पो.ना. गजानन कठाणे, संजय लाडे, पो.शि. अभय इंगळे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये