ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना BLO च्या कामातून वगळण्यात यावे

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची मागणी

चांदा ब्लास्ट

       नुकतेच मुंबई व उपनगर भागातील शिक्षकांना बिएलओ च्या अशैक्षणिक कामातून मुक्त करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याचप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यातील शिक्षकांना सुद्धा या कामातून मुक्त करावे अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने प्रसाद पाटील राज्याध्यक्ष, हरीश ससनकर राज्य सरचिटणीस यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आली.

     मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी 22 फेब्रुवारी च्या पत्रानुसार शिक्षक व विद्यार्थ्यांची बाजू समजून घेतली याबद्दल महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे. BLO च्या कामामुळे राज्यभरातील शिक्षक विद्यार्थी व पालक त्रस्त आहेत, विद्यार्थ्यांना शिकवण्याचा बराचसा वेळ यामध्ये वाया जात आहे. ज्याप्रमाणे मुंबई व उपनगर भागातील शिक्षकांना या कामातून वगळून दिलासा दिला आहे त्याचप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यातील शिक्षकांना सुद्धा दिलासा द्यावा व BLO हँडबुक मध्ये नमूद अन्य 12 संवर्गातील कर्मचारी व नव्याने ऍड केलेले सेवानिवृत्त कर्मचारी यांना BLO चे काम देण्यात यावे .अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर राज्य नेते विजय भोगेकर, राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरिश ससनकर, राज्य कार्याध्यक्ष प्रकाश पाध्ये, राज्य कोषाध्यक्ष बालाजी पांडागळे, महिला राज्याध्यक्ष डॉ.अल्का ठाकरे, सचिव शारदा वाडकर, राज्य संघटक भुपेश वाघ, राज्य उपाध्यक्ष जी.एस.मंगनाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

असे जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार,जिल्हा सरचिटणीस सुरेश गिलोरकर,जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर बोढे, जिल्हा कोषाध्यक्ष सुनिल कोहपरे यांनी माहिती दिलेली आहे असे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख लक्ष्मण खोब्रागडे यांनी कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये