ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डालमिया भारत फाऊंडेशनने तर्फे क्षयरुग्णांना ‘पोषण आहार किट’चे वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

आज दिनांक २१/०२/२०२४ रोजी प्रा.आ.केंद्र नारंडा येथे डालमिया भारत फाऊंडेशनने तर्फे “प्रधानमंत्री नि-क्षय मित्र टीबी निर्मूलन” कार्यक्रमा अंतर्गत कंपनी लगतच्या गावातील आर्थिकदृष्ट्या मागास क्षयरुग्णांना “पोषण आहार किट” चे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत रुग्णांना डालमिया फाउंडेशन तर्फे पुढील सहा महिने साहाय्य करण्यात येईल. तसेच उपचार सुरु असलेल्या क्षय रुग्णांना साहाय्य केल्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी कोरपना व जिवती यांचे हस्ते फाउंडेशन ला प्रशस्ती-पत्र देण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री. अभिषेक कुमार मिश्रा (प्लांट एचआर हेड) व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. श्री. राजेश जुनोनकर (हेड-सेक्युरिटी), श्री. पारखी, जिल्हा समन्वयक, प्रा. आ. केंद्र कर्मचारी आणि फाऊंडेशन तर्फे श्री. प्रशांत भिमनवर व चमू उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये