ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

23 ते 28 फेब्रुवारी दरम्यान रोटरी उत्सवाचे आयोजन – ग्रामीण भागात विकासाचे मॉडेल होणार प्रस्तुत

1 लाख 55 हजार वर्ग फुटाच्या जागेत होणार आयोजन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच, राजुरा

रोटरी क्लब, राजुरा यांच्या वतीने दिनांक २३ ते २८ फेब्रुवारी २०२४ दरम्यान अंगदनगर, बामनवाडा रोड, राजुरा येथे रोटरी उत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सायंकाळी ५ ते रात्री १०-३० पर्यंत हा उत्सव सुरू राहणार आहे. या उत्सवाचे उदघाटन २३ फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता होणार असून अनेक मान्यवर यावेळी आपली हजेरी लागणार आहेत, अशी माहीती रोटरी क्लब राजुरा चे अध्यक्ष कमल बजाज यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बामनवाडा येथे सुमारे १ लाख ५५ हजार वर्गफूट अशा विशाल मैदानावर हा रोटरी उत्सव होणार असून यात विविध प्रकारचे सुमारे १५० स्टाॅल्स राहणार आहेत. याठीकाणी विविध रंगारंग कार्यक्रम, विविध मनोरंजन सामग्री और खेळ कार्यक्रम, स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे स्टाॅल, फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स, गिफ्ट आयटम्स, घरपयोगी वास्तु, ऑटोमोबाईल्स, सौंदर्यप्रसाधन, संपत्ती, टूर्स ट्रवल्स, ग्राहपयोगी वस्तुही राहणार आहेत. येथे अनेक सेवाभावी संस्था, बचत गट यांना मोफत स्टाॅल देण्यात आले असून ग्रामीण भागात विकासाचे माॅडेलही येथे प्रस्तुत होणार आहे.

राजुरा येथे पहिल्यांदाच या रोटरी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून नागरिक, शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होऊन आनंदाचा लाभ घेण्याचे आवाहन राजुरा रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे कमल बजाज, निखील चांडक, मयुुर बोनगिरवार, समीर चिल्लावार, अड. जगजीवन इंगोले, आनंद चांडक, अमोल कोंडावार, अभिषेक गंपावार, सारंग गिरसावळे यांनी पत्रकार परिषदेत केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये