ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवसेना शिंदे गटातर्फे राहुल गांधी व काँग्रेसचा निषेध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        आपल्या परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केले.त्यामुळे आरक्षण व संविधान विरोधात काँग्रेस पक्ष असल्याची टीका करीत शिवसेना शिंदे गटातर्फे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पक्षाचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या नेतृत्वात काँग्रेस तथा राहुल गांधीचा निषेध करण्यात आला.

यावेळी काँग्रेस व राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा देत त्यांचा उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध केला. काँग्रेस पक्ष हा खरा आंबेडकर विरोधी असून काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये