ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिखे इंडिया उत्सवातून आल्या विद्यार्थ्यांच्या कलाकृती समोर

सिखे इंडिया उत्सवात पालकवर्गाचा उत्स्फूर्त सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

            सिखे संस्था, मुंबई आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग चंद्रपूर यांच्या संयुक्त सहभागातून भद्रावती पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘टीचर इनोव्हेटर प्रोग्रॅम’ (TIP) हा उपक्रम सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत वर्षभर राबविण्यात आलेल्या उपक्रमांतून विद्यार्थी काय शिकले यांचे “सीखे इंडिया उत्सव” हे शैक्षणीक प्रदर्शन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिरादेवी येथे भरविण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेली गोष्टींची पुस्तके आणि गणितातील अपूर्णांकावरील नाविन्यपूर्ण पद्ध्तीने मॉडेल बघण्यास पालकवर्गाने उत्स्फूर्त सहभाग घेतला.

शिक्षकांनी TIP प्रशिक्षणाअंतर्गत अपूर्णांकावर आधारित भाषा व गणित विषयाच्या नावीन्यपूर्ण पद्धती विद्यार्थ्यांसोबत वर्गात घेतल्या. या उपक्रमातून विद्यार्थी कसे शिकते झाले, याबाबत शाळा स्तरावर प्रदर्शन भरवून विद्यार्थी काय शिकले हे स्पष्ट करण्यात आले.

  या दरम्यान जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिरादेवी येथील विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरी काढून प्रदर्षणाविषयी जनजागृती करण्यात केली. यावेळी गावाचे सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माता पालक संघ, प्रतिष्ठित नागरिक आणि गावकरी देखील उपस्थित होते. या प्रदर्शनात शाळेतील विद्यार्थांनी अपूर्णांकाचे वेगेवगळे चार्ट, वर्गातील पुस्तकांचे कपाट, खेळण्याचे कपाट आणि खेळाचे मैदान इत्यादी मॉडेल तर भाषा विषयात विविध गोष्टींची पुस्तके, शब्द भिंत, गोष्टीच्या घटकांवर आधारित चार्ट तयार केलेले होते आणि त्यावर माहिती सादर केली. यावेळी गावकरी आणि पालकांनी उत्साहाने विद्यार्थांना प्रश्न विचारले तसेच TIP कार्य पुस्तिका देखील बघितल्या.

  या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मुख्या. राजेश वागदरकर, उद्घाटक म्हणून गावच्या सरपंच निरुपलाताई मेश्राम, प्रमुख अतिथी उपसरपंच प्रदीप देवतळे, पोलीस पाटील बंडू जोगी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविंद्र कोंगरे तसेच माता पालक संघ यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका नीता डाखरे, शिक्षक राजू चौधरी वि.शी. अजय मुसळे तसेच ढोरवासा केंद्राचे कोच पल्लवी वाळके तसेच विद्यार्थांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये