ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बीट स्तरीय शालेय बाल क्रीडा, सांस्कृतिक तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह संपन्न

शिक्षणातुन संवेदनशील माणूस घडवा : सरपंच विजेंद्र वानखेडे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

                 शिक्षण हे समाजसुधारनेचे प्रभावी माध्यम आहे .समाजाच्या उत्थानासाठी महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपले आयुष्य वेचले व शिक्षणाची दारे सर्वांना खुली केले. या शिक्षणातुन संवेदनाशील माणुस घडला पाहिजे, शिक्षणातुन मानवी मुल्य रुजली पाहिजे.असे प्रतिपादन पाटाळा येथील सरपंच श्री.विजेंद्र वानखेडे यांनी केले. जिल्हा परिषद शाळा पाटाळा येथे बीट स्तरीय शालेय बाल क्रीडा तथा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पाटाळा येथील सरपंच श्री. विजेंद्र वानखेडे बोलत होते.

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी मा.कु. कल्पना सिध्दमशेट्टीवार तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सरंपंच श्री. विजेंद्र वानखेडे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून अध्यक्ष,तं मु स पाटाळा येथील श्री. मुर्लीधरजी गेडाम, सौ. मोनिका काळे उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती पाटाळा, श्री. अविनाश आगलावे, सौ. योगीता जिवतोडे, सौ. निलीमा चांदेकर, श्री. एस. बि. टोंगे ग्रामसेवक ग्रामपंचायत पाटाळा तथा सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. याप्रसंगी पाटाळा या खेडेगावातील कु. राधिका सुभाष लोनगाडगे यांनी एम. एससी.वनस्पतीशास्त्र (Botany) या विषयात गोंडवाना विद्यापिठातुन तिसरा क्रमांक मीळवल्याबद्दल पाटाळा गावातील सरपंच श्री. विजेंद्र बाबाराव वानखेडे यांनी तिचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भारतीय संविधान देऊन सत्कार केला.

जि.प.शाळा पाटाळा येथील शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती पाटाळा येथील सर्व पदाधिकारी व सर्व उपस्थित ग्रामस्थ यांनी कु. राधीका सुभाष लोनगाडगे यांच्या यशाचे कौतुक केलं. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण विस्तार अधिकारी मा . कु. कल्पना सिध्दमशेट्टीवार यांनी विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. आपल्या आवडिच्या क्षेत्रात जिद्दीने पुढे जाण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रस्तावीक जि. प.शाळेचे मुख्यध्यापक श्री रविकांत टोंगे सर यांनी केले, संचालन श्री. शरद कोंदडवार सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. गिरीधर पिंपळशेंडे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती पाटाळा येथील सर्व पदाधीकारी व ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये