ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कस्तुरबा कान्व्हेंटचे वार्षीक स्नेह सम्मेलन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

शहरातील देऊळगाव राजा शिक्षण संस्था द्वारा संचालित कस्तूरबा कॉन्व्हेंट येथील वार्षीक स्नेह सम्मेलन नुकतेच संपन्न झाले,विदयाथ्यांनी विवीध सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले.

देऊळगांव राजा शिक्षण संस्थे द्वारा संचालीत संचालीत कस्तूरबा कान्व्हेंट येथे वार्षीक स्नेह सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते या स्नेह सम्मेलनाचे उद्घाटन स्वाती भोसले सहा अभियंता जिल्हा परिषद बुलडाणा – यांच्या शुभ हस्ते तसेच शहरातील सुप्रसिद्ध डॉ अनूजा डोणगांवकर,प्राचार्य आर बी कोल्हे, मुख्याध्यापीका एकविरा कुळकर्णी, पर्यवेक्षक राठोड सर,वालेकर मॅडम, यांच्या प्रमुख उपस्थितीत दिप प्रज्वलन करून करण्यात आले.

प्रास्तावीक मुख्याध्यापीका कुळकर्णी मॅडम यांनी केले . मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये लहान मुलांनी नृत्य , वेशभूषा ‘नाटिका व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.उपस्थित पालकांनी टाळ्या वाजवून विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. बक्षीस वितरण रामपूरकर मॅडम – मनिष गुप्ता सागर कायस्थ आदींच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन निलम गुप्ता, सुप्रिया बन्सीले व स्मीता गाडेकर यांनी केले वार्षिक स्नेहसंमेलनच्या यशस्वीतेसाठी मुख्यध्यपीका कुळकर्णी मॅडम, निलम गुप्ता, मंजूषा मोताळे, संध्या वाघमारे – रेणूका पूजारी – श्रृतीका भंडारी – स्मिता गाडेकर – सुप्रिया दहीले वनीता वगदे, सितल भाग्यवंत -कल्पना कुळकर्णी, माधवी तेलंग- समता ढवळी वर्षा लताड – मंगला मुळे, कौशल्या भाग्यवंत -रेणूका माळोदे व शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये