रामनवमी निमित्त शहरात प्रभू श्रीरामाची भव्य शोभायात्रा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा शहरातील वाल्मीक नगर व माळीपुरा येथील श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम नवमी निमित्त श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. माळीपुरा येथील श्रीराम मंदिर येथून शहरातून प्रभू रामचंद्राची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
रामनवमीनिमित्त देऊळगाव राजा शहरातील विविध भागांमध्ये प्रभू श्रीरामाची जयंती भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली शहरातील वाल्मीक नगर व माळीपुरा येथील श्रीराम मंदिर येथे श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. बारा वाजता राम जन्मोत्सव भक्ती मय वातावरणात साजरा करण्यात आला. सायंकाळी सहा वाजता माळीपुरा येथील श्रीराम मंदिर इथून प्रभू श्रीरामाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ग्रामदैवत श्री बालाजी मंदिर समोर शोभायात्रेचे श्री बालाजी संस्थांनच्या वतीने स्वागत करण्यात आले.
आमदार मनोज कायंदे यांनी पुजा केली,जय श्रीरामाच्या गजरामध्ये बालाजी नगरी दुमदुमून गेली. शोभा यात्रेची सांगता श्री चौंडेश्वरी मंदिर येथे झाली यानंतर सर्व रामभक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले . सदर शोभायात्रेचे आयोजन समस्त श्रीरामभक्त देऊळगांव राजा यांनी केले होते.