ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रस्ता सुरक्षा अभियान सन 2024 चा समारोप कार्यक्रम आयोजित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय वर्धा द्वारे रस्ता सुरक्षा अभियान सन 2024 चा समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष विधी व सेवा प्राधिकरण चे सचिव विवेक देशमुख, उप शिक्षण अधिकारी वर्धा उषा तळवेकर, वाहतूक नियंत्रण शाखा चे पि आय चंद्रशेखर चकाटे,जवाहर नवोदय विद्यालयचे टी जी टी शशिकांत जाधव व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समीर शेख उपस्थित होते.

यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचे विजेते यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस व सर्टिफिकेट देऊन गौरव करण्यात आले. तसेच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय तर्फे आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिर मध्ये सहभागी झालेल्या राजेंद्र गायकवाड, राहुल भगत, महिंद्रा गायकवाड वाहन चालकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चष्मा वाटप करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये