ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दारूची अवैध्यरित्या वाहतुक करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

एकुण 2 लाख 38 हजार 300 रू.चा दारूसाठा जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सविस्तर याप्रमाणे आहे की, दिनांक 12.02.2024 रोजी कळवं येथिल काही इसम हे त्यांचे मोपेड गाडीने अवैध्यरित्या देशी दारूचा माल भरून दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्हयात वाहतुक करीत असल्याबाबत मुखबिरकडुन खात्रीशीर माहिती मिळाल्याने पो.स्टे. अल्लीपुर हददीतील मौजा गडेगाव ते अलमडोह शिवारात रोडवर सापळा रचुन नाकेबंदी केली असता मिळालेल्या माहिती प्रमाणे,

एक ब्राउन रंगाची सजुकी अॅसेस मोपेड गाडी कमांक MH-29-CC-4154 वर दोन इसम बसुन असलेली मोपेड गाडी येताना दिसली सदर मोपेड गाडीला पंच व पोलीस स्टॉफचे मदतीने थांबवुन चेक केले असता सदर मोपेड गाडीचे पायदानवर प्लॅस्टीक चुगंडीमध्ये व डिक्की मध्ये देशी दारूच्या गोवा संत्रा कपंनीच्या 180 एम.एलच्या 96 सिलबंद शिश्या कि. 14,400/-रू. मोपेड गाडीसह 1,19,400/-रु. चा मुददेमाल जप्त करून आरोपी नामे 1) राजेश पाडुरंग डुकरे, वय 19 वर्ष, 2) गणेश विजय ठाकरे, वय 20 वर्ष, 3) मुन्ना लाखीया, देशी भटटी दुकानदार (पसार) सर्व रा. कळंब जि. यवतमाळ यांचेविरूध्द पो.स्टे. अल्लीपुर येथे अप.क. 76/24 कलम 65 (अ) (ई), 77 (अ), 83 म.दा.का. सहकलम 3(1) 181,130/177 मो.वा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

तसेच पो.स्टे. अल्लीपुर हददीतील मौजा गडेगाव शिवारात रोडवर सापळा रचुन नाकेबंदी केली असता मिळालेल्या माहिती प्रमाणे एक काळया रंगाची सजुकी अॅसेस मोपेड गाडी कमांक MH-32-AV-0910 वर दोन इसम बसुन असलेली मोपेड गाडी येताना दिसली सदर मोपेड गाडीला पंच व पोलीस स्टॉफचे मदतीने थांबवुन चेक केले असता सदर मोपेड गाडीचे पायदानवर प्लॅस्टीक चुगंडीमध्ये व डिक्की मध्ये देशी दारूच्या गोवा संत्रा कपंनीच्या 180 एम. एलच्या 126 सिलबंद शिश्या कि. 18,900/-रू. मोपेड गाडीसह 1,18,900/-रु. चा मुददेमाल जप्त करून आरोपी नामे 1) सुरज गजानन बावणे, वय 31 वर्ष, 2) सांगर विजय भोयर, वय 22 वर्ष, दोन्ही रा. कळवं जि. यवतमाळ 3) मुन्ना लाखीया, देशी भटटी दुकानदार (पसार) सर्व रा. कळंब जि. यवतमाळ यांचेविरूध्द पो.स्टे. अल्लीपुर येथे अप.क. 77/24 कलम 65 (अ) (ई), 77 (अ), 83 म.दा.का. सहकलम 3(1) 181,130/177 मो.वा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरूल हसन, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्री. सागर कवडे, पोलीस निरीक्षक श्री. संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा वर्धा स.पो.नि. प्रफुल डाहुले, ठाणेदार पो.स्टे. अल्लीपुर यांचे निर्देशानुसार पोलीस अमलदार मनोज धात्रक, अरविंद येणुरकर, संजय बोगा, अनुप कावळे, विनोद कापसे, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये