ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयाचे रासेयो शिबीर

आसन (बु) येथे संपन्न  

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

गडचांदूर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स येथील NSS विभागातर्फे रासेयोचे विशेष शिबीर आसन (बु) येथे दिनांक ५ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी २०२४ दरम्यान घेण्यात आले. उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माँ. सुभाषभाऊ धोटे, अध्यक्ष गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर तथा आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र उपस्थित राहून समस्त ग्रामवासी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दिनांक ७ फेब्र.रक्तगट हिमोग्लोबिन तपासणी शिबीर रक्त गट तपासणी शिबीर डॉ उत्कर्ष मून आणि श्री चेतन वानखेडे यांच्या सहभाग आणि नियोजनातुन यशस्वी झाला,दुपारी बौद्धिक सत्र व सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दिनांक ८ला सकाळी पशुवैद्यकीय तपासणी शिबीर दिनांक ९ ला सकाळी वैद्यकीय शिबिराच्या माध्यमातून ग्रामवासियांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन व औषधोपचार करण्यात आले व दुपारी माँ. विजय आकनुरवार यांचे रासेयो चा उदय, विकास व महत्व यावर बौद्धिक मार्गदर्शन झाले. हा दैनिक क्रम शिबिराच्या माध्यमातून चालविण्यात आला तसेच गावातील वृद्ध, व महिला यांनी सुद्धा विद्यार्थ्यांसोबत आपल्यातल्या कलागुणांना मंचावर प्रस्तुत केले. दिनांक १० फेब्रुवारी सकाळी मतदार जनजागृती व नवमतदार नोंदणी साठी रॅली काढण्यात आली आणि दुपारी या शिबिराचा समारोप करण्यात आला.

त्यावेळी असा कार्यक्रम पुन्हा याच गावात घेण्याची विनंती लोकांनी महाविद्यालयाला केली. रासेयोचे असे शिबीर प्रथमच होत असल्यामुळे ग्रामवासियांत मोठ्या उत्साहाचे वातावरण होते, गाव सोडताना कित्येकांचे ऊर भरून आले होते.शिबिराच्या समारंभ वेळी असं बुद्रुक येथील माजी सैनिक श्री सोमेश्वरजी आडे ज्यांनी पोखरण येथील अनुस्फोटात प्रत्यक्ष भाग घेतला होता यांची सुद्धा महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शिबिराच्या आयोजनात आसन बुद्रुक येथील सर्व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग व सहकार्य लाभले त्यामध्ये सरपंच सौ माधुरी टीका उपसरपंच श्री आशिष देवकर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ नंदा येसेकर आणि ग्राम विकास अधिकारी श्री धनराज डुकरे तसेच ग्रामपंचायत सदस्य बंडू नैताम इत्यादी ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले.

याप्रसंगी सामोरोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव सर व उपस्थितीमध्ये महाविद्यालयातील NSS चे कोऑर्डिनेटवर डॉ. संदीप घोडीले यांनी शिबिराचे महत्व स्पष्ट केले. करियर कट्टाचे प्रा. पवन चटारे, विद्यार्थी विकास विभागाचे डॉ. अजय शर्मा ग्रंथपाल प्रा. मनोहर बांदरे, IQAC चे डॉ. उत्कर्ष मून तसेच प्रा. रामकृष्ण पटले, प्रा.चेतन वानखेडे प्रा. चेतन वैद्य हि प्राध्यापक मंडळी उपस्थित होती. याशिवाय शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये