7 महिन्यापासुन पळुन गेलेल्या अल्पवयीन मुलीस धुळे जिल्हयातुन ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
फिर्यादी यांनी दि.19/10/2024 रोजी पोलीस स्टेशन कारंजा घाडगे येथे तोंडी रिपोर्ट दिला की, त्यांची अल्पवयीन मुलगी वय अंदाजे 15 वर्षे हि दि.18/10/2024 रोजी अंदाजे 09/00 वा.दरम्यान दिशा कम्प्युटर इंस्टुट येथे क्लास ला गेली ती परत आली नाही. तिचा नातेवाईक व इतर शोध घेतला परंतु ती मिळुन आली नाही. तिला कोणी तरी अज्ञात इसमाने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावुन पळवून नेले. अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन कारंजा घाडगे येथे अप क्र. 657/2024 कलम 137 (2),143 (4) BNS प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.
सदर गुन्ह्याचा तपास दि. 07/05/2025 रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा तथा स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचेकडे वर्ग करण्यात आला. सदर गुन्ह्यात मा. श्री अनुराग जैन पोलीस अधीक्षक सा. वर्धा तथा अप्पर पोलीस अधीक्षक श्री डॉ. सागर कवडे यांनी दिलेल्या विशेष सूचना व निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा तथा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांचे मार्गदर्शक पथक तयार करण्यात आले. गुन्हयात मुखबिर लावून व तांत्रिक तपास करून माहिती घेतली असता सदर पीडित मुलगी आपले इंस्टाग्राम फ्रेंड वणी जिल्हा यवतमाळ येथे जाऊन ती दोन-तीन दिवस राहिली व तेथून ती नागपूरला येऊन आपला इंस्टाग्राम वरील दुसरा मित्र राहणार येवला जिल्हा नाशिक याच्याकडे गेली व तेथे सहा सात महिने राहिली त्यानंतर त्याच्यासोबत वाद होत असल्याने स्वतः निघून ती मालेगाव जिल्हा नाशिक येथे गेली. व रडत असता तिला अनिल गायकवाड व त्याची पत्नी भेटली सदर मुलीचे बरे वाईट होऊ नये म्हणून त्याने सदर पीडित मुलीस आपले घरी नेले अशी माहिती प्राप्त झाल्याने या वरुन पिडीत मुलीचा शोध घेतला असता ती चाळीसगाव जवळील हेंद्रुन ता.जि. धुळे येथील अनिल गायकवाड याचे घरी मिळून आली. तिला तिचे आई- वडीलासमक्ष सोबत घेऊन कायदेशिररित्या पोलिस स्टेशन कारंजा घाडगे यांचे ताब्यात देऊन पुढील तपास पोलीस स्टेशन कारंजा घाडगे येथील पो.उप.नि.पेदोंर हे करीत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन सा. , अप्पर पोलीस अधीक्षक श्री डाॅ. सागर कवडे सा. यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात स.फौ. सुभाष राऊत, पो.हवा. नितेश मेश्राम, पो.शि. नवनाथ मुंडे असे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा आणि पो.हवा. अक्षय राऊत, गोविंद मुंडे सायबर सेल वर्धा यांनी केली.