ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपणा क्षेत्रामध्ये वन प्राण्यामुळे रब्बी हंगामातील पिकाचे व कापसाचे मोठे प्रमाणात नुकसान

नवनवीन गावठी जुगाड करून वाचवावे लागत आहे रब्बी हंगामातील पिके

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसल्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले म्हणून शेतकऱ्यांनी रबरी पिक हरभरा गहू पेरणीला सुरुवात झाली आहे मात्र जंगलात असलेले वन प्राणी शेतकऱ्याच्या हातात आलेला मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे दिवसभर शेतात शेतकरी काबाड कष्ट करून घरी येतात मात्र पुन्हा रात्र च्या वेळी रब्बी पिके व पराठीचे सुद्धा वन प्राणी मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे आपले पिके वाचवण्याकरिता शेतकरी रात्रभर शेतामध्ये जागल करतात तसेच पेरणी झाल्यापासून जंगलात असलेले प्राणी डुक्कर व रोयाडापासून पिकाचा बचाव व्हावा.

याउद्देशाने शेतकरी हा आपापल्या शेतात पिक वाचवण्यासाठी फिनालचा वापर करणे शेकोट्या पेटवणे असे अनेक उपाय शेतकरी करतात यापासून आपल्या वन प्राण्याचा बंदोबस्त होऊ शकतो आणि मी आपलं पीक भरू शकतो या आसे पोटी ज्या व्यक्तीने सांगितल्या त्या पद्धतीचा उपयोग करून शेतकरी आपला पीक वाचवण्याचा प्रयत्न करीत असतो अनेक समस्येच्या समोर कधीकधी निसर्ग ही साथ देत नाही आणि उपलब्ध असलेले सुविधा म्हणजेच वीर बोरवेल पाणी घ्यायचं म्हटलं तर तिकडे लाईनचा प्रॉब्लेम येतो म्हणजे लोड शूटिंग यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्याला तोंड द्यावे लागत आहे आणि एवढे मेहनत करून आपल्या लेकराप्रमाणे आपल्या पिकाला संगोपन करून उत्पन्न घेतो मात्र उत्पन्न घेतल्यानंतरही त्याला योग्य भाव मिळत नाही अशी एकंदरीय असणारी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वनविभाग यांनी वन प्राण्याचे बंदोबस्त करण्यात यावे तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे ताबडतोब पंचनामे करून मोबदला देण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये