ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनो स्पर्धा परिक्षाकडे लक्ष केंद्रित करा – डॅा. क्षमा गवई

जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालयात साहित्य भेट

चांदा ब्लास्ट

आजचे युग हे स्पर्धा परीक्षेचे युग आहे. दहावी, बारावी, पदवीचे शिक्षण झाल्याबरोबर विद्यार्थी-विद्यार्थिनी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. स्पर्धा परीक्षेची तयारी कमी वयापासून केल्यास नक्कीच यश मिळेल त्यामुळे विद्यार्थ्यांनो स्पर्धा परीक्षेकडे लक्ष केंद्रित करा असे प्रतिपादन डॅा. क्षमा गवई यांनी केले.
चंद्रपुरातील जनता महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या प्राध्यापिका असलेल्या प्रा. डॉ. क्षमा गवई यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विचारज्योत फाऊंडेशनच्या सहकार्याने वरुर रोड येथील जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालयात भेट दिली. या भेटीत त्यांनी वाचनालयाला आवश्यक असलेले विविध साहित्य भेट दिले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरूर रोडच्या उपसरपंच विजया करमनकर होत्या तर याप्रसंगी नितीन लांडे, विचारज्योत फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरज पी. दहागावकर, ज्येष्ठ नागरिक बाबूराव कमलवार यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. वाचनालयाच्या विद्यार्थ्यांनी गीत सादर करून डॉ. गवई यांचा वाढदिवस साजरा केला. सर्व प्रमुख पाहुण्यांचे महापुरुषांचे ग्रंथभेट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
आज गावखेड्यामध्ये फारश्या सुविधा नसताना सुद्धा विद्यार्थी शिक्षण घेत आहे. कठीण परिस्थितीतुनच विद्यार्थ्यांनी यश गाठावे. मोबाईलचा वापर कमी करून विद्यार्थ्यानी पुस्तकांशी मैत्री करावी. असे मत विचारज्योत फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरज पी. दहागावकर यांनी केले.
वाचनालयाला स्पर्धा परीक्षा पुस्तके, दहावी व बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना एक्साम पॅड, विद्यार्थ्यांच्या कला, गुणांना वाव मिळावा याकरिता इलेक्ट्रोनिक स्पीकर, खाली बसण्याकरिता मॅट, दरी तसेच लहान विद्यार्थ्यासाठी बाल साहित्य वितरण करण्यात आले. विशाल शेंडे यांनी वाचनालयाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन विशाल शेंडे यांनी तर आभार स्वप्नील जीवतोडे यांनी मानले. आयोजनाकरिता सागर बोरकर,प्रवीण चौधरी, प्रकाश बोरकुठे, प्रज्ज्वल बोरकर, समीक्षा मोडक, गौरव हिवरे, समीक्षा जीवतोडे, यश बोरकुटे, घुगुल, श्रुती बोरकर, तेजस वडस्कर यांनी सहकार्य केले.
शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये