आमदार सुधाकरराव अडबाले यांचे उपस्थितीत जिल्हा परिषद शाळा चिचपल्ली येथे सांस्कृतिक महोत्सव
चांदा ब्लास्ट
७५ वा अमृत महोत्सवी “प्रजासत्ताक दिनानिमित्य” जि.प.उच्च प्राथ.शाळा चिचपल्ली येथे सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून मान.आमदार सुधाकरराव अडबाले विधान परिषद म.रा.यांची उपस्थिती लाभली. याक्षणी मान.रज्जूभैय्या ठाकूर,मान.गौतमभाऊ निमगडे माजी जि.प.सदस्य, मान.मनिषजी तिवारी चंद्रपूर, मान. पपिता कुमरे सरपंच ग्रा.पं. चिचपल्ली, मान.दिपकभाऊ रामटेके अध्यक्ष शा. व्य.स.चिचपल्ली, सर्व ग्रा.पं.चे पदाधिकारी तथा सर्व शा.व्य.स.चे पदाधिकारी उपस्थित होते.सर्व महापुरुषांचे फोटोला माल्यार्पण करण्यात आले तद्नंतर सर्वांचे पुष्प तथा शाल व श्रीफळ देऊन स्वागत सत्कार करण्यात आले.यावेळी आमदार महोदय मान.सुधाकर अडबाले सर यांनी शाळेला संपूर्ण मैदानाला गट्टू लावून देण्यात येईल, ई- लर्निंग संच पुरविण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मु.अ.विजय वनकर केंद्रप्रमुख यांनी केले. बहारदार सुत्रसंचालन कु. अर्चना येरणे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.लीना आवळे मॅडम यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यव.समितीचे अध्यक्ष तथा सर्व पदाधिकारी, आणि तथागत खोब्रागडे व कु.मिनल दोडके यांनी अथक परिश्रम घेतले हे मात्र विशेष.
विशेष आभार
कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर माजी सभापती तथा संचालक तसेच जिल्हा परिषदचे माजी सभापती दिनेश चोखारे आणि मान.आशिष रणदिवे कडून जि.प.उच्च प्राथ.शाळा चिचपल्ली शाळेला ग्रीन मॅट भेट स्वरूपात देण्यात आल्या. त्याबद्दल शाळा प्रशासनाचे वतीने आभार मानण्यात आले.