ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समर्थ कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा खरीप शिवार फेरीत सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात अकोला येथे आयोजित शिवार फेरीला समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथील विद्यार्थ्यांनी भेट दिली.

शिवार फेरीदरम्यान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख सर यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या ठिकाणी लावलेले प्रात्यक्षिक पाहण्यासाठी विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. विद्यापीठाच्या २५ एकर प्रक्षेत्रावर विविध पीक वाण तसेच तंत्रज्ञानाचे सादरीकरण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी शिवार फेरीमध्ये सोयाबीन ,कपाशी, तेलबिया वाण, फुल पिके, भाजीपाला तसेच वेलवर्गीय पिकांची माहिती घेतली.

प्रामुख्याने प्रक्षेत्रावर विद्यापीठाच्या वाणाचे तसेच कंपन्यांच्या वाणांचे समोरासमोर सादरीकरण असल्याने विद्यार्थ्यांना तुलनात्मक माहिती माहिती सुद्धा या अनुषंगाने उपलब्ध झाली. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात विद्यार्थीनी प्रात्यक्षिक पाहून शास्त्रज्ञाकडून माहिती घेतली. या शिवार फेरीचे आयोजन दीक्षारंभ छात्र प्रेरणा कार्यक्रम अंतर्गत डॉ. नितीन मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिवार फेरीतून विद्यार्थ्यांनी नवीन पिक वाण व तंत्रज्ञान समजून घेतले.

यावेळी विद्यार्थ्यासह प्रा. अश्विनी जाधव, प्रा.योगेश चगदळे,प्रा. विकास म्हस्के उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये