ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रवादी कॉंग्रेस विधानसभा अध्यक्ष पदावर शरद जोगी यांची नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.  प्रमोद गिरडकर

                 ‘महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस चेप्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा प्रमुख पदावर गडचांदूर येथील नगर परिषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी यांची नियुक्तीतालुकास्तरीय सभेमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष नितीन भटारकर यांनी नियुक्तीपत्र देऊन त्यांचे स्वागत केले यापूर्वी शरद जोगी हे तालुकाराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडली होती.

तसेच त्यांच्या कार्यकाळात गडचांदूर येथील नगर परिषदेमध्ये नगरसेवक विजय होत उपाध्यक्ष पदाची माळा शरद जोगी यांच्या गळ्यात पडली होती कामाचा अनुभव लक्षात घेता त्यांची विधानसभेच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सय्यद आबीदअलीमहेंद्र चंदेल संतोष देरकर करण सिंग प्रवीण काकडे आकाश मनोज धानोरकर श्रीराम टेकामनरेश बोरडे अशोक बोधेयांचे सह तालुक्यातील ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी नितीन भटारकर यांनी पक्ष संघटन व सर्वांनासोबत घेऊन पक्ष बांधणीच्या कार्याला पदाधिकाऱ्यांनी अधिक महत्त्व देऊन गाव पातळीपासून पक्ष बांधणीच्या कार्याला सुरू करण्याची गरज आहे.

माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार प्रफुल भाई पटेल धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष संघटनाचा कार्य सुरू झालेला आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या कामगारांच्या प्रश्न याला प्राधान्य देऊन कामाला कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन पक्षाचे विचार अखेरच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये वातावरण चांगले असून जिल्ह्याभरामध्ये लवकरच तालुका व विधानसभेच्या नियुक्ती करण्यात येईल असे मत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रवीण काकडे यांनी तर आभार योगेश कावळे यांनी मानले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये