ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उभ्या ट्रकला कॅप्सूल कंटेनरची धडक 

एक ठार ; महाराष्ट्र - तेलंगणा राज्य सीमेवरील घटना 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना – कोरपना – आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील राज्यसीमेजवळ उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने कॅप्सूल कंटेनर तील चालक गंभीररित्या जखमी होऊन मृत पावल्याची घटना शुक्रवार दिनांक २१ रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली.

आनंद इराप्पा वाढोणकर (४८) रा. आमनी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ असे मृत कॅप्सूल कंटेनर चालकाचे नाव आहे. तो कॅप्सूल कंटेनर क्रमांक एम एच ४५ एफ ७३४७ ने आदिलाबाद कडे जात असताना महामार्गावरील त्याने उभ्या ट्रक क्र टी एस ०१ यू सी ६१४४ ला जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीरित्या जखमी होऊन तो जागीच मृत पावला. या घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. मृत कॅप्सूल कंटेनर वाहन चालकाला ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे आणले. त्यानंतर त्याच्या पार्थिवाचे शव विच्छेदन करण्यात आले. मृतकाच्या मागे पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. या घटनेने आमनी गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.

या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक लता वाडीये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देवानंद केकन, प्रकाश राठोड, पोलीस कर्मचारी जितेंद्र राजूरकर, अभिजीत चहारे व कोरपना पोलीस करित आहे.

मृतकाच्या मोठ्या मुलीची होती पाहणी

मृतक आनंद हा कुटुंबातील एकमेव कर्ता पुरुष होता. त्याच्या मागे पत्नी , तीन मुली असा परिवार असल्याने त्यांच्या सर्वांची जबाबदारी त्याच्यावरच होती. त्याच्या मोठ्या मुलीला पाहण्यासाठी शनिवारी वराकडील मंडळी येणार होती.

अशातच तो घरी पोहचण्या आधीच ही दुर्दैवी घटना घडली. त्याच्या या एका एकी अपघाती जाण्याने कुटुंबाचा आधारवडच हिरावला गेला आहे. यामुळे आमनी गावासह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये