ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शरद जोगी मित्र मंडळातर्फे कोरपना व जिवती तालुक्यातील पोषण आहार किट वाटप

शासकीय आरोग्य योजना मधून क्षयरोग नियंत्रणासाठी निशुल्क औषध उपचार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

भारत सरकारने वर्ष 2025 पर्यंत श्रेयरोग मुक्त भारत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे त्या अनुषंगाने अंतर्गत उपचारासाठी आलेल्या व संमती दिलेल्या सर्व श्रेय रुग्णांना सामाजिक संस्था औद्योगिक संस्था व समाजातील दानशूर व व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीचे नोंद निक्षेय मित्र म्हणून करून त्यांच्यामार्फत क्षयरोग रुग्णांना अतिरिक्त पोषण आहार किट देण्याकरिता केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री टीबी मुक्त अभियान राबविण्यात येत आहे.

शासकीय आरोग्य योजना मधून क्षयरोग नियंत्रणासाठी निशुल्क औषध उपचार व मानसिक 500 रुपये अनुदान मिळते मात्र ग्रामीण भागातील रुग्णांना औषध उपचारासह सकस पोषण आहार फार गरजेचा असून याच अनुषंगाने प्रजासत्ताक दिनाचे, औचित्य साधुन सादर नगरपरिषद चे उपाध्यक्ष शरद जोगी यांनी मदतीचा हात दिल्याने कोरपणा व जिवती तालुक्यातील दहा क्षयरोग रुग्णांना याचा लाभ मिळाला आहे शरद भाऊ जोगी मित्र मंडळातर्फे कोरपणा व जिवती तालुक्यातील क्षयरोग टीबी रुग्णांना सकस पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी शहरातील दानशूर व्यक्तिमत्व व नगरपंचायत उपाध्यक्ष शरद जोगी प्रमुख पाहुणे आरोग्य व पाणीपुरवठा सभापती विक्रम येरने, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वप्निल टेंभे, आरोग्य सहाय्यक देवाडकर, व तालुका आरोग्य अधिकारी जिवती व कोरपणा येथील सर्व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवाळकर सूत्रसंचालनशी कल्पक ठमके, तर आभार प्रदर्शन सचिन बर्डे यांनी केले कार्यक्रमाची रूपरेषा राजे हिरमट यांनी सांगितले यशस्वी ती करिता चंद्रशेखर पारखी सचिन बर्डे व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये