ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सावित्रीबाई फुले विद्यालयात हुतात्मा दिन साजरा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर येथे दि . ३० जानेवारीला राष्ट्रपिता म. गांधी यांची पुण्यतिथि हुतात्मा दिना निमित्त त्यांच्या प्रतिमेला शाळेचे पर्यवेक्षक महेंद्र कुमार ताकसांडे यांनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.
तसेच म. गांधी यांच्या जीवनकार्याची त्यांनी माहिती सांगितली. याप्रसंगी शाळेतील शिक्षक सर्वस्वी सुरेश पाटील, बावनकर, मांढरे, वासेकर, माधुरी उमरे, किन्नाके, भुवनेश्वरी गोपमवार जी. एन. बोबडे यांचेसह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी शशीकांत चन्ने, सिताराम पिंपळशेंडे, लिलाधर भत्ते, संकल्प भसारकर, शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन तथा आभार वि. एम. मरस्कोल्हे यांनी केले.