ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रवादीतर्फे महारोजगार मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दि.४ फेब्रुवारी २०२४ रोज रविवारला श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल,देऊळगाव ‌राजा येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

 सदर मेळाव्याची जनजागृती करण्यासाठी व त्याचा लाभ जास्तीत जास्त बेरोजगार तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घ्यावा याकरिता समर्थ कृषी महाविद्यालय,श्री व्यंकटेश महाविद्यालय त्याचबरोबर शहरातील विविध कोचिंग क्लासेस ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भेट देऊन विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली व रोजगार मेळाव्यासंदर्भात मागदर्शन करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित बेरोगारांसाठी ही सुवर्णसंधी असून याचा लाभ जास्तीत जास्त युवक,युवती यांनी घ्यावा व मेळाव्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन यावेळी राष्ट्रवादी काँगेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केले

यावेळी गंगाधर जाधव,राजीव सिरसाठ,बंडू बुरकुल,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बंडू झोरे,रफिक पठाण,सय्यद करीम,प्रदीप वाघ,शांतू भाग्यवंत,बबन कासारे, दिलीपकुमार झोटे, कदीर शेख,काशिफ कोटकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व अनेक युवकांची उपस्थित होती

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये