ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागरिकांनी आरोग्य संकल्प अभियानाचा लाभ घ्यावा – डॉ.अभ्युदय मेघे

आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचा उपक्रम ; 900 पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला लाभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आर्थिक बचतीचे जसे नियोजन आपण करतो. त्याच पद्धतीने आपल्या आरोग्याच्या देखील नियोजन करण्यात तितकेच महत्त्वाचे आहे. आरोग्याच्या बाबतीत नागरिकांनी गंभीर असेल महत्त्वाचे आहे.हा पुढील संपूर्ण आठवडा भर विविध ठिकाणी आरोग्य संकल्प अभियानाचे आयोजन केले आहे.त्याचे सर्वांनी लाभ घ्यावी अशी विनंती यावेळी डॉ.अभ्युदय मेघे यांनी यावेळी केले.ते आरोग्य संकल्प अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी सालोड हिरापुर येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे व वर्धा सोशल फोरम,भारतीय जनता युवा मोर्चा,तसेच ग्रामपंचायत कार्यालय सालोड हीरापुर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य संकल्प अभियानचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मंचावर अमित देशमुख संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा,नानाजी देशमुख माजी सरपंच मंचावर उपस्थित होते.

अमित देशमुख यांनी अभियानाच्या आयोजनाबद्दल डॉ.मेघे यांचे आभार मानले.ते म्हणाले,की नुकताच तीन दिवस मुसळधार पाऊस संपूर्ण वर्धा जिल्हा सुरू आहे.यामुळे अनेक नागरिकांना आरोग्याच्या समस्या पुढे येत आहे. अश्याच आज या शिबिरामुळे गावातील अनेक गरजवंताला या शिबिराचा फायदा झाला आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महेश टेकाम,पोलिस पाटील,मुन्ना सय्यद,नंदू वघळे,पांडुरंग हिंगे,अरविन्द देशमुख,सलीम पठान,दीपक हजारे,धिरज झाडे,बाळा वाघ,तुषार देशमुख,प्रशांत राऊत,माला धूरवे,वांदिले काकु आशा सेविका,राहुल थेरेकार,राकेश गडेरिया,डॉ.फाईजन खान, डॉ.साईबा मंचीनेही, डॉ. शुभम दुर्गे.डॉ. आकृती शेंडे, डॉ. जानमेजय पटेल, डॉ.मिलिंद घरपिंडे यांचे योगदान लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये