ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रेरणा महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

गडचांदुर येथील प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालयात दि 25 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अधक्ष्य म्हणून प्राचार्य मा.नानेश्र्वर धोटे, मा.अरविंद मुसने,प्रा.राहुल ठोंबरे, प्रा. मनीषा मरसकोल्हे,प्रा.सचिन पवार,प्रा. श्रीकांत घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना प्राचार्य नानेश्र्वर धोटे सर म्हणाले की, जगातील सर्वात मोठी लोकशाही आपली आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी सुज्ञ लोकप्रतिनिधी आपण मतदानाच्या माध्यमातून निवडून देणे गरजेचे आहे. सुशासन आणि उत्तम प्रशासन यावर प्रत्येक भारतीय नागरीकाचा अधिकार आहे. याबाबतची जागरूकता मतदार दिनाच्या माध्यमातून करणे गरजेचे आहे. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून याद्वारे राष्ट्रसेवा करण्याचे आवाहन यांनी केले.

प्रा. राहुल ठोंबरे भाषणात म्हणाले की, आपली समृद्ध लोकशाही ही राजकीय पक्ष व मतदार यावर टिकून आहे. देशातील प्रत्येक नागरीकाने मतदानाचा हक्क बजावून चांगले लोकप्रतिनिधी निवडणे गरजेचे आहे. त्यामुळे महासत्येचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल असा विश्वास यांनी व्यक्त केला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.मनीषा मरसकोल्हे यांनी केले.संचालन रुपाली टेकाम हिने तर आभार प्रफुल मांडवकर याने मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये