ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हेल्मेट परिधान करून वाहन चालविणाऱ्या दुचाकी चालकांना फुलगुच्छ देऊन स्वागत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

रस्ता सुरक्षा अभियान २०२४ अंतर्गत आज दिनांक २०/०१/२०२४ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय द्व्यारे हेल्मेट परिधान करून वाहन चालविणाऱ्या दुचाकी चालकांना फुल गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच विना हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकी वाहन चालकावर व ट्रिपल सीट चालणाऱ्या वाहन चालकावर कारवाई करण्यात आली.

यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय येथील मोटर वाहन निरीक्षक प्रफुल्ल मेश्राम, सहायक मोटर वाहन निरीक्षक विशाल भगत, वाहन चालक टिक्कस उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये