ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागभीड नगर परिषद क्षेत्रातील खड्डा ठरतोय, अपघातास निमंत्रण

नगर परिषद, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभीड नगर परिषद क्षेत्रातील ३५३ डी नागपूर-गडचिरोली मार्गांवरील नवीन रेल्वे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी खड्डे पडून अनेक वाहन नुकसान ग्रस्त झाले आहेत. तसेच काही अपघात होऊन मरण पावले असताना ना.. नगर परिषद ना.. बांधकाम विभाग लक्ष देत यामुळे हा खड्ड्यात पडून वन विभागाचे वनरक्षक खोब्रागडे वाहनसह गुरुवारी रात्री जखमी झाले असून वाहन क्षतीग्रस्त झाले आहे.

यापूर्वीही एक मोठे वाहन अडकल्याने वाहतूक काही काळ बंद झाली होती पण अजूनही याकडे तालुका प्रशासन तथा तहसीलदार यांनी मुख्याधिकारी यांना याची सूचना दिली असताना याकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येत आहे यामुळे हा खड्ड्यात पडून काही मृत्यूस कारणीभूत ठरल्यास जबाबदार कोण?  हा विषय सध्या ऐरणीवर असल्याने कोण ही समस्या दूर करेल याकडे नागभीडकरांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये