ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्रामसेवकाचा प्रताप., केली दुकानदाराला धक्काबुक्की

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा पंचायत समिती ग्रामपंचायत कढोली खुर्द येथील ग्रामसेवक कार्यरत होते परंतु काही प्रशासकीय कारणास्तव ग्रामसेवकांना कोरपणा पंचायत समितीमध्ये कार्यरत करण्यात आले.

   काढोली खु.येथे कार्यरत असताना ग्रामपंचायत मध्ये काही वस्तूची खरेदी आर्थिक व्यवहरा वरून घटना घडली

प्राप्त माहितीनुसार वनसडी येथील गणपत ताजने इलेक्ट्रिक च असल्यामुळे कोरपणा तालुक्यात ग्रामपंचायतला लागणारे इलेक्ट्रिक साहित्य पुरवितात 15 दिवसापूर्वी कडोली ग्रामपंचायत चे ग्रामसेवक विलास चव्हाण सचिव हे माझ्या दुकानात आले व त्यांच्या ग्रामपंचायतला लागणारे इलेक्ट्रिक सामान नेले व त्यांनी त्या सामानाची बिल पावती त्याचवेळी दिली दिनांक 10 जानेवारी दुपारी चार वाजता सुमारास ग्रामसेवक हे ताजने यांच्या दुकानात आला मी नेलेले इलेक्ट्रिक सामानाचे कोरे बिल पावती दे अजून दुकानदार ताजने यांना मागत होते.

परंतु, ताजने यांनी तुम्हाला सामान देते वेळी सर्व बिल इलेक्ट्रिक सामानाचे बिल दिले आता मी देत नाही असे म्हटल्यावर सचिव विलास चव्हाण यांनी ताजने दुकानदारांना हाताले बुक्क्या बुक्क्याने मारहाण केली असे ताजने दुकानदार यांनी तोंडी व मेडिकल रिपोर्ट मध्ये व त्यांच्या दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये फोटोज दाखवण्यात आले कोरपणा पोलीस स्टेशन येथे अदाखल पात्र क्रमांक 8 / 2024 कलम 323, 504,भादवी गुन्हा दाखल विलास चव्हाण ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास कोरपणा पोलीस स्टेशन करीत आहे .ग्रामसेवकाच्या प्रतापाची चर्चा परिसरात एकवण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये