ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुरु गोविंद सिंग अधर्म, अत्याचार आणि अन्याय विरोधात लढणारे ऐतिहासिक महापुरुष – आ. किशोर जोरगेवार

गुरु गोविंद सिंग यांच्या जयंती निमित्त पडोली येथील गुरुद्वारा येथे कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट 

गुरु गोविंद सिंग यांच्या संपूर्ण जीवनातून आपल्याला अत्याचार आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळते. ते एक ऐतिहासिक महापुरुष होते त्यांची लढाई अधर्म, अत्याचार आणि अन्याय विरोधात होती. त्यांची शिकवण प्रेरणादायी असल्याची भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.

      शिखांचे दहावे गुरू, गुरु गोविंद सिंग जी यांचे आज ३५७ वे प्रकाश पर्व आहे. या निमित्त पडोली येथील गुरुद्वारा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित राहत दर्शन घेतले. यावेळी पडोली येथील गुरु तेगबहादुर साहेब गुरुद्वाराचे अध्यक्ष राणा पालसिंग, बलदेव सिंग, जगतार सिंग, हरदियाल सिंग, नागी आणि मारबा परिवारातील सदस्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

         सर्वांनाच आपल्या नावाचीही इतिहासात नोंद व्हावी असे वाटते पण जे ऐतिहासिक महापुरुष होते. त्यांनी कधीही जमीन, धन-संपत्ती, राजसत्ता-प्राप्ती किंवा यशप्राप्तीसाठी लढाई केली नाही. गुरु गोविंद सिंग असेच एक ऐतिहासिक महापुरुष होते. आज त्याच्या 357 व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पडोली येथील  तेगबहादुर साहेब गुरुद्वारा येथेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दर्शन घेतले. या कार्यक्रमाला शीख समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये