ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागभीड पोलीस हद्दीत गावोगावी दारूचा महापूर

पोलीस विभागावर शंका, जणकल्यानाचे तीन -तेरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभीड तालुक्यातील नागभीड पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याला ऊत आला असून अनेक गावात दारूचा महापूर आल्याचे दिसत असून जणसामान्य कल्याण होण्याऐवजी गुन्हेगारी कडे कल दिसत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंद्याला आळा बसावा म्हणून ठाणेदार यांनी गस्त घालीत रात्रभर सायरण वाजवीला जातो मात्र चोराला सावध करण्याचा तर हा प्रकार तर नाहीना. नागभीड येथून ग्रामीण भागात खुले आम दारूची वाहतूक केली जाते.त्यात जर सापडली तर सेटिंग करून विल्लेवाट लावली जात असून काही वसुली साठी बदली झाल्यानंतर त्यांना मात्र सोडले जात नाही असाही प्रकार नागभीड येथील पोलीस स्टेशन मध्ये दिसून येत आहे. यामुळे सर्वत्र दारूच्या पुरामुळे ग्रामीण भागातील जनता व्यसनाकडे वळत असून गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये