“गडचांदुर गौरव सोहळा” आयोजनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार
निलेश ताजने जन्मदिवस औचित्याने कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- मानवरूपी देहामध्ये नानाविध कलागुणांचा आविष्कार असतो.प्रतिभावंत व्यक्ती स्व-कर्माने अंतरंगात असलेल्या प्रतिभेला निश्चीत वेळेत उजागर करीत असतात.हिच बाब अंगिकृत केलेल्या गडचांदुर नगरातील उद्योग क्षेत्रात भरारी घेतलेल्या निलेश ताजणे या ध्येयवेड्या तरूणाला तंतोतंत लागू होते.भागातील अनेक सामाजिक तथा धार्मिक उपक्रमात ताजणे यांचा सहभाग अग्रभागी असतो. दिनदुबळ्यांच्या हाकेला धाऊन जाणारा नेता,म्हणून त्यांची प्रचिती सर्वश्रुत आहे.
निलेश ताजणे यांचा अभिष्टचिंतन सोहळा नुकताच गडचांदुर येथिल भाऊराव पाटील आश्रम शाळा येथे नाविन्यपूर्ण उपक्रमानी संपन्न झाला.यावेळी भागातील प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी,प्रभावी बचत गट,प्राविण्य प्राप्त विद्यार्थी, आदर्श शिक्षक यांचा सत्कार करून संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटक चंद्रपुर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी माजी आमदार संजय धोटे,भाजपा नगर जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार, प्रकाश देवतळे,नामदेव डाहुले, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष महेश देवकते,सतिश धोटे,भाजपा जेष्ठ नेते अरूण मस्की,डॉ.अंकुश गोतावळे,युवा नेतृत्व आशिष देवतळे,अनय जयस्वाल, शेतकरी नेते आबिद अली, बलराम डोडाणी,तुषार सोम,सुरेश केंद्रे, शिवाजी शेलोकर,रामसेवक मोरे,संदिप शेरकी,महादेव जयस्वाल,दिलीप वांढरे,संदिप गायकवाड,रवी गुरूनुले,ॲड.अर्पित धोटे,दशरथ सिंह ठाकुर,महादेव तपासे,आशिष चव्हाण,संदिप पारखी,सचिन शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
भारत माता आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरीशचंद्र थिपे गुरूजी यांनी निलेश ताजणे यांचे संघर्षमय जीवन रेखाटले.
जिवन जगण्याची कला मानसाला संघर्ष शिकवित असतो,माझेही जिवन संघर्षमय होते,जिवन जगण्याची खरी कला संघर्ष शिकवितो.निलेश आपण क्षेत्रात उभरते नेते आहात.समोर आपणास जनसेवेसाठी अविरत प्रयत्न करायचे आहे हा आपला संकल्प राहिल.चंद्रपुर शहरात अम्मा का टिफीन माध्यमातून दररोज ३५० लोकांना भोजण मिळतय आणी याच स्तुत्य उपक्रमातुन मला आशिर्वादाची पावती मिळते ही माझी खरी कमाई आहे.आपणही मागिल तिन वर्षापासुन दिनदुबळ्यांच्या सेवेत तत्पर असता,ही स्तुत्याची बाब आहे.
आई महाकाली आपल्या पाठीशी आहे तुम्ही अविरत जनसेवा करीत रहा,असे संबोधनात किशोर जोरगेवार म्हणाले.
संजय धोटे यांनी निलेश ताजणे यांच्यातला सकारात्मक भाव विशद करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी अनेक मान्यवरांचे संबोधन झाले.निलेश ताजने यांनी मनोगत व्यक्त करताना जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या गडचांदूरची सेवा विविध माध्यमातून करीत आलो आणि यापुढे ही करीत राहणार असल्याचे सांगितले. राजकारण माझा पिंड नाही.स्पष्ट वक्ता असल्याने अडचणी फार येतात.परंतु त्यावरही मात करून जनसेवेचा व्रत मी अविरत अंगिकारून दिनदुबळ्यांच्या सेवेत रममाण होत राहिल.
येणाऱ्या काळात ग्रीन गडचांदूर योजना राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.माझ्या सर्व हितचिंतक बांधवांसमवेत जनकार्य करण्यास मी सदैव तत्पर राहिन,असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रगतशील शेतकरी हरिभाऊ थिपे,बंडु थेरे,संजय मेंढी,शंकर उरकून्डे,सोनडवले, मंगेश लोहे,साईनाथ कुंभारे, अंकुश धाबेकर, प्रफुल मालेकर,यांचा शेती कार्या बद्दल सत्कार करण्यात आला.सोबतच गुणवंत विद्यार्थी, प्रभावी महिला बचत गट, उत्कृष्ट शिक्षक वृंद यांचा ही यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला जिवती,राजुरा, कोरपणा तालुक्यातील तिन हजार पेक्षा जास्त बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.मंथनवार व स्नेहा काकडे यांनी केले.आभार प्रदर्शन सपना शेलोकर यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी श्रीतेज फाऊंडेशन,निलेश ताजणे मित्र परिवार यांनी विशेष सहकार्य केले.