देऊळगाव मही येथील सर्व महिलांसाठी विशेष सूचना!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महाराष्ट्र शासन व कृषी विभागाच्या ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६’ अंतर्गत मौजे देऊळगाव मही तालुका: देऊळगाव राजा येथील सर्व महिलांसाठी ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे.
या योजनेमुळे महिला शेतकऱ्यांना कृषी योजनांचा प्राधान्याने लाभ मिळणे, आर्थिक सबलीकरण होणे आणि विविध शासकीय सवलती प्राप्त करणे सुलभ होणार आहे.
तरी गावातील सर्व पात्र महिलांनी खालील आवश्यक कागदपत्रांसह आपली नोंदणी त्वरीत करून घ्यावी.
आवश्यक कागदपत्र
1.आधार कार्ड क्रमांक
2.मोबाईल क्रमांक (आधारशी लिंक असलेला)
नोंदणी ठिकाण
ठिकाण: गावातील सर्व CSC केंद्र ,
सर्व महिलांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व आपले ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ वेळेत प्राप्त करून घ्यावे, असे नम्र आवाहन श्री. विकास घुसळकर सहाय्यक कृषी अधिकारी, मौजे देऊळगाव मही यांचे मार्फत करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी श्री. विकास घुसळकर
सहाय्यक कृषी अधिकारी,
मौजे देऊळगाव मही,
संपर्क क्रमांक: 9890861178 यांच्याशी संपर्क साधावा.



