ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वसंतराव नाईक विद्यालयात कृषी दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना – हरित क्रांतीचे जनक व दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोरपना येथे कृषी दिन साजरा करण्यात आला. तसेच ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ कोरपना चे अध्यक्ष श्रीधरराव गोडे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा , विद्यालयातील शिक्षक साधूजी बावणे यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार , विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप आदी कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीधरराव गोडे, सचिव भाऊराव कारेकर, उपाध्यक्ष रमाकांत मालेकर, संचालक नामदेवराव जोगी, अरुण कुकडे , गणेश गोडे, जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक अनिल रेगुंडवार सेवानिवृत्त शिक्षक नारायण हजारे, साधुजी बावणे, नादिर कादरी, विद्यालयाचे प्राचार्य डी जी खडसे, पर्यवेक्षक पी बी बोंडे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितानी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश गोडे, संचालन पी बी बोंडे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये