ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एसटी बस चालकाच्या व वाहकाच्या मदतीने जखमी वयोवृद्धांला मिळाला वेळेवर उपचार

त्या दोघांनी वयोवृद्धाचा जीव वाचवण्यासाठी केलेली धडपड ठरली प्रशंसनीय...

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रह्मपुरी :- माणुस जर माणसाशी माणुसकीने वागला तर माणुसकी जिवंत आहे हे आपल्या लक्षात येते. त्यामुळे त्यांचे समाजातील व्यक्तीमध्ये आदर सुद्धा वाढतो. आणि लोक त्यांच्याकडे आपुलकीच्या नात्याने बघतात. संकटाच्या वेळी धावून येतो तोच खरा मित्र अशी मनी सुद्धा प्रचलित आहे. नुकताच माणुसकीचे दर्शन घडवणारा असाच प्रसंग नागभीड ते ब्रह्मपुरी रोड वरील कोरधा गावाजवळ पाहायला मिळाला. रक्तस्त्रावाने लाल झालेल्या कपड्यावर रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत पळून असलेल्या एका वयोवृद्धाला वाचविण्यासाठी एसटी बसचा चालक व वाहकाने कसलाही विचार न करता एसटीत बसलेल्या प्रवासाच्या मदतीने त्वरित ब्रह्मपुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून वेळीच उपचार मिळावुन दिल्यामुळे त्या वयोवृद्धाचे प्राण वाचले. त्यामुळे त्यांनी समाधान सुद्धा व्यक्त केला आहे.

        प्राप्त माहितीनुसार नागभीड तालुक्यातील रा. ईरव्हा टेकरी येतील 70 वर्षीय हा वयोवृद्ध दि 3 जानेवारी 2024 ला सकाळी 8 वा काही घरगूती कामानिमित्त कोर्धा येथे येऊन आपले काम आटोपून आपलें गावाकडे सायकलने परत जात असताना 11 वाजता नागभीड ते ब्रम्हपुरी हायवे रोडवरील कोर्धा गावचे समोर त्याची सायकल स्लिप झाल्याने ते डोक्यावर रोडवर पडले रोडवर पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागून ते तिथेच पडून होते त्यादरम्यान नागपूर ते गडचिरोली जाणाऱ्या बस क्र ,MH 13 CU 7398 चे चालक नामे भुजंग मशाखेत्री, व वाहक वाघ भूषण सरदार यांनी मागचा पुढचा विचार न करता इतर लोकांच्या मदतीने त्या वृद्ध इसमास उपजिल्हा रुग्णालय ब्रह्मपुरी येथे आणून भरती केले. व सदर घटनेची माहिती ब्रह्मपुरी पोलिसांना कळविली.

लगेच ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निशांत जुनूनकर आपल्या पोलीस कर्मचाऱ्यासह रुग्णालयात पोहोचले वृद्ध इसमाच्या नातेवाईकांचा शोध घेतला व त्यांना माहिती देऊन रुग्णालयात बोलविले मग झालेल्या घटनेची संपूर्ण माहिती त्यांनी दिली. उपचार झाल्यावर सदर वृद्ध इसमाने व त्यांच्या नातेवाईकांनी ब्रह्मपुरी पोलीस, एसटी महामंडळ, तसेच उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांचे विशेष आभार मानून समाधान व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये