ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा फुले प्रागतिक विद्यालय, हिंगणघाट येथील विद्यार्थ्यांना सायबर जनजागृती अंतर्गत सायबर गुन्ह्याबाबत माहिती देवुन मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

महात्मा फुले प्रागतिक विद्यालय, हिंगणघाट येथील विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्याबाबत माहिती देण्याकरिता दि. ०७.०८.२०२३ शाळेतर्फे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर मार्गदर्शन शिबीरामध्ये सायबर शाखेतील श्री. निलेश कट्टोजवार, श्री. निकेश गुजर व श्रीमती स्मिता महाजन यांनी मोबाईल, फेसबूक, व्हॉट्सअप व इतर सोशल मिडीयाचे गैरवापर रोखण्याकरीता व सायबर जगात स्वतः ला सुरक्षीत ठेवणे संबंधाने विद्यार्थांना माहिती दिली तसेच ऑनलाईन बँकींग व्यवहारातील फसवणुकीपासून स्वत:चा बचाव करुन इतर लोकांना सुध्दा सतर्क करण्याबाबत सांगण्यात आले. तसेच सध्याच्या युगात विद्यार्थ्यांना मोबाईलचे व्यसन जडले असल्याचे लक्षात येत असल्याने विद्यार्थ्यांना मोबाईलचे फायदे व मोबाईल पासुन होणारे दुष्परीणाम याबाबत माहिती देण्यात आली. गुन्हा होण्यापूर्वी त्यावर प्रतिबंध व जनजागृती हाच नुकसानापासून वाचण्याचा सर्वात चांगला उपाय आहे.

सदर कार्यक्रमास महात्मा फुले प्रागतिक विद्यालय, हिंगणघाट येथील मुख्याध्यापक वाघमारे, श्री वंजारी सर, खेळकर सर, कु. ढोले व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच एकूण ५५ विद्यार्थी उपस्थीत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये