ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपणा येथे लैंगिक अत्याचार प्रकरणात निषेध मोर्चा

कोरपणा येथील शिक्षक अमोल लोडे अध्यक्ष युवक काँग्रेस यांना कडक शिक्षा व्हावी - मा.आमदार ॲड.संजय धोटे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

मा.आमदार ॲड.संजय धोटे यांनी सदर केस प्रकरण स्पेशल पब्लिक प्रास्युकुटरला देऊन फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवण्याची मागणी केली

कोरपना येथील इमिनेन्स इंटरनॅशनल स्कुल या शाळेत शिकणाऱ्या १२ वर्षीय चिमुकल्या विद्यार्थीनीवर कोरपना शहर युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष असलेल्या शिक्षक अमोल लोडे या नीच इसमाने माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले.

त्याचा व त्याच्या नीचप्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो.

पोलीस प्रशासनाने आरोपीला अटक केली असली तरी, या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही व्हावी आणि शिक्षा ठोठावण्यात यावी, काँग्रेस नेते आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. जे त्यांना मदत करीत आहे त्यांना अटक व्हावी व पिडीत मुलीला व त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण मिळावे.

माजी आमदार अँड संजय धोटे यांनी या प्रकरणात स्पेशल पब्लिक प्रास्युकुटर देऊन फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महोदय यांच्या कडे केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये