ताज्या घडामोडी

रस्त्यावर धावत्या ओमनी गाडीला अचानक लागली आग

द बर्निग कार ची नेरी जाभुळघाट मार्गावरील घटना

चांदा ब्लास्ट -चिमूर -रोहन नन्नावरे

चिमूर तालुक्यातील नेरी जाभुळघाट मार्गावर रामपूर जवळ दि 25 ला रात्री साडे नऊ वाजता दरम्यान नवरगाव येथील कार्यक्रम आटपुन नागपूर ला जात असताना नेरी वरून 3 की मी पुढे रामपूर जवळ एम एच 49 ए ई 4397 या क्रमांकाच्या ओमनी गाडीने अचानक पेट घेतली आणि क्षणात संपूर्ण वाहन आगीच्या कवेत आले संपुर्ण वाहन जळून भस्म झाले मात्र पत्रकार प्रवीण वाघे यांनी तात्काळ दखल घेत कार्यकुशलतेने वाहनातील दोन महिला आणि एका पुरुषाला बाहेर काढीत त्यांचे प्राण वाचविण्यात मोलाचे योगदान दिले त्यामुळे कोणाचेही प्राणहानी झाली नाही
सविस्तर माहिती अशी की नागपूर येथील नागरिक धम्म मेळावा या कार्यक्रमासाठी सिंदेवाही तालुक्यातील नवरगावला गेले होते कार्यक्रम आटपून परत नेरी जाभुळघाट मार्गाने जात असताना नेरी समोर 3 किमी पुढे रामपूर जवळ अचानक त्यांच्या ओमनी वाहनाला आग लागली पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण करीत संपूर्ण वाहन आगीच्या कवेत आले मात्र नशीब बलवत्तर म्हणून तीन प्रवाश्यांचे प्राण वाचविण्यात पत्रकार प्रवीण वाघे याना यश आले प्रवीण वाघे हे नागपूर वरुन नेरीला येत असताना रस्त्यात आगीत वाहन जळताना दिसले त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ वाहनजवळ जाऊन पाहिले असता वाहन पेटत असून तीन प्रवाशी बसले असल्याचे पाहिले तात्काळ कार्यकुशलतेने दोन महिला व एका पुरुषांला बाहेर काढले आणि त्यांचे जीव वाचविण्यात यश मिळविले यानंतर तात्काळ पोलीस स्टेशन ला माहिती दिली माहिती मिळताच चिमूर पोलीस दाखल झाले अग्निशमन दलाला माहिती देताच आग विजविण्यासाठी तात्काळ गाडी दाखल झाली आग विजविण्यात आली मात्र वाहन जळून अवशेष उरले होते आग कशाने लागली याचे कारण कळू शकले नाही याचे तपास चिमूर पोलीस करीत आहे मात्र प्रवीण वाघेच्या कार्यकुशलतेने तीन जणांचे प्राण वाचवण्यासाठी केलेल्या कार्याचे गौरव होत असून सर्वच स्तरावरून त्यांचे कौतुक केले जात असून अभिनंदन केले जात आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये